मुंबई : सोशल मीडियाच्या या जगात आपण पाहू तितके व्हिडीओ कमीच आहेत. एकदा का आपण सोशल मीडियावर गेलो की, येथे आपला कसा वेळ निघून जातो हे कळत नाही. ज्यामुळे लोक तासनतास येथे ऑनलाईन असतात. सध्या लोका चॅटेंससाठी कमी पण असे व्हिडीओ पाहण्यासाठी सोशल मीडियाचा जास्त वापर करु लागले आहेत. येथे आपल्या असे काही व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपलं मनोरंजन करतात. तर काही व्हिडीओ हे असे व्हिडीओ असतात, जे आपल्यासमोर उदाहरण ठेवतात. ज्यामुळे आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं.
खरंतर आज कालच्या तरुण पिढीला सगळ्या गोष्टी सोप्या करायला आवडत नाहीत. ते काही ना काही स्टंट किंवा असं काही कृत्य करतात, ज्यामुळे कधी त्यांना स्वत:ला दुखापत होते. तर बऱ्याचदा त्यांच्यामुळे इतरांना दुखापत सहन करावी लागते.
सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ देखील असाच काहीसा आहे. जो पाहून तुमच्या संवेदना उडतील... हो, या व्हिडीओमध्ये एक तरुण स्वीमिंगपूलमध्ये उडी मारण्यापूर्वी स्टंटबाजी करतो. ज्यामुळे त्याला गंभीर दुखापत होते. त्याचा हा फसलेला स्टंट पाहून तुमच्या ही अंगावर काटा उभा राहिल.
या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण स्वीमिंगपूल समोर उभा आहे आणि तो या पाण्यात उडी मारण्याच्या तयारीत असतो. परंतु तेव्हाच तो एक फ्लीप मारतो आणि त्याचा तोल जातो, ज्यामुळे तो स्वीमिंगपुलमध्ये न पडता, मध्ये असलेल्या गॅपमध्ये पडतो.
तुम्ही पाहू शकता हा तरुण नुसताच पडत नाही, तर त्याची मान त्या गॅपमध्ये जाऊन अडकते. आपण तो व्हिडीओ पाहातानाच आपल्या पोटात इतका गोळा येत आहे. यावरुन तुम्ही विचार करु शकता की, या तरुणाला किती मोठी दुखापत झाली असावी.
Yoooooo ain’t no way pic.twitter.com/nmmyyx2lI5
— ENTERTAINMENT NETWORK (@dailyinstavids) July 12, 2022
हा व्हिडीओ @dailyinstavids नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. जो इतका व्हायरल झाला की बातमी लिहिपर्यंत ५१ लाखांहून अधिक लोकांनी पाहिली आहे.
हा व्हिडीओ सर्वच तरुणांसाठी एक उदाहरण आहे. त्यामुळे तुम्ही देखील असं काहीतरी करण्यापूर्वी शंभरवेळा विचार करा.