Big News : भारताला हादरा! भूकंपामुळं देशातील एक प्रांत उध्वस्त; मृतांचा आकडा 1000 पार

घरांमध्ये झोपलेली कुटुंबच्या कुटुंब ढिगाऱ्याखाली... 

Updated: Jun 23, 2022, 08:07 AM IST
Big News : भारताला हादरा! भूकंपामुळं देशातील एक प्रांत उध्वस्त; मृतांचा आकडा 1000 पार  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळं सध्या अफगाणिस्तानवर मोठं संकट ओढवल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास या देशातील पूर्व प्रांतात झालेल्या विनाशकारी भूकंपामध्ये मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्त हानी झाली. 6.1 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपामुळं इथं घरंच्या घरं आणि एक संपूर्ण प्रांत उध्वस्त झाला आहे. 

सध्याच्या घडीला समोर आलेल्या आकडेवारीनुसार या भागात जवळपास 1000 मृतांची नोंद करण्यात आली आहे. तर, जखमींचा आकडा 1500 च्याही पलीकडे पोहोचला आहे. (Big news 1000 killed in Afghanistan Earthquake)

मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती प्रशासन आणि बचाव पथकांनी व्यक्त केली आहे. इतकंच नव्हे, तर अफगाणिस्तानमधील सत्ताधाऱ्यांकडून आंतरराष्ट्रीय स्तरावरही मदतीची साद घालण्यात आली आहे. 

अफगाणिस्तानमधील खोस्त शहरापासून 44 किमी अंतरावर भूकंपचा केंद्रबिंदू असल्याचं सांगण्याच आलं. या भूकंपामुळं भारत, पाकिस्तान इथंही काही प्रमाणात धरणीकंप जाणवल्याची माहिती समोर आली. अफगाणिस्तानधील गयान आणि बारमल या जिल्ह्यांमध्ये भूकंपामुळं मोठ्या प्रमामात नुकसान झाल्याचं कळत आहे. 

भूकंपाचं प्रमाण आणि एकंदर आकडेवारी पाहता मागील 10 वर्षांमध्ये अफगाणिस्तानात जवळपास 7000 जणांचा जीव गेल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून कळत आहे.