हाहाकार! भुकंपानं हादरला देश, ओढावला 155 जणांचा मृत्यू

मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्त हानी झाल्याचं वृत्त हाती आलं आहे. 

Updated: Jun 22, 2022, 12:15 PM IST
हाहाकार! भुकंपानं हादरला देश, ओढावला 155 जणांचा मृत्यू  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

Earthquake of 6.1 magnitude hits Afghanistan: महाराष्ट्र आणि भारतात राजकीय भूकंप आलेला असतानाच तिथं संपूर्ण जगाला हादवणारी बातमी समोर आली आहे. बुधवारी अफगाणिस्तानमध्ये आलेल्या भूकंपामुळं मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्त हानी झाल्याचं वृत्त हाती आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत या नैसर्गिक आपत्तीमध्ये जवळपास 155 जणांचा मृत्यू ओढावला आहे. 

संबंधित यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानसोबतच पाकिस्तानातही भुकंपाचे जाणवले. अफगाणिस्तानातील सरकारी वाहिनीच्या वृत्तानुसार देशाच्या पूर्व प्रांतात आलेल्या या जबर भुकंपात 155 जणांना जीव गमवावा लागला आहे. 

पक्तिका प्रांतात सर्वात मोठं नुकसान 
तालिबान सरकारमधील आपत्ती व्यवस्थापन विभागातील प्रमुख नसीम हक्कानी  यांनी दिलेल्या माहितीनुसार पक्तिका भागात या भुकंपाचे थेट आणि विध्वंसक परिणाम दिसून आले आहेत. इथं आतापर्यंत 155 जणांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याचीही भीती प्रशासनानं व्यक्त केली आहे. 

250 हून अधिजण जखमी असल्याचंही प्रशासनानं सांगितलं आहे. घटनास्थळी सध्या बचाव पथकांच्या कामाला वेग आला आहे. प्राथमिक माहितीनुसार हा भूकंप 6.1 magnitude इतका असल्याचं सांगण्यात येत आहे. 

सध्या या घटनेनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे. येत्या काळात अफगाणिस्तान या आपत्तीच्या माऱ्यातून कसं सावरतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.