मुंबई : एका टीव्ही पत्रकाराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांची अवस्था इतकी वाईट झाली आहे की त्याला रस्त्यावर खाद्यपदार्थ विकावे लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. या पोस्टवर अनेकजण पत्रकाराबद्दल सहानुभूती व्यक्त करताना दिसत आहेत.
अफगाणिस्तानमधील हे प्रकरण आहे. माजी राष्ट्रपती हमीद करझाई यांच्या सरकारमध्ये काम केलेले कबीर हकमाली यांनी ट्विट करून एका पत्रकाराची गोष्ट शेअर केलीये. त्यांनी त्याचे तीन फोटोही शेअर केलेत. एकामध्ये तो स्टुडिओमध्ये अँकरच्या पोजमध्ये बसलेला दिसत आहे. दुसऱ्यामध्ये तो रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थ विकायला घेऊन बसलेला दिसतोय.
कबीर हकमाली यांनी ट्विट करत म्हटले की, तालिबानी राजवटीत अफगाणिस्तानमधील पत्रकारांचे जीवन. मुसा मोहम्मदी यांनी अनेक वर्षे अँकर आणि रिपोर्टर म्हणून वेगवेगळ्या टीव्ही चॅनेलमध्ये काम केले. आता त्यांच्याकडे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठीही पैसे नाहीत. स्ट्रीट फूड विकून तो काही पैसे कमावतो. लोकशाही संपल्यापासून अफगाण जनता अभूतपूर्व गरिबीचा सामना करत आहे.
Journalists life in #Afghanistan under the #Taliban. Musa Mohammadi worked for years as anchor & reporter in different TV channels, now has no income to fed his family. & sells street food to earn some money. #Afghans suffer unprecedented poverty after the fall of republic. pic.twitter.com/nCTTIbfZN3
— Kabir Haqmal (@Haqmal) June 15, 2022
या पोस्टवर अनेक भारतीय लोकांनी ही कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले - भारताकडून प्रेम आणि काळजी... आशा आहे की भारत सरकार या लोकांना मदत करेल. दुसर्याने लिहिले - भारतात या, इथे अधिक संधी आहेत.
याआधी कबीर यांनी ट्विट करून आणखी एका पत्रकाराचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर त्यांनी एकराम इस्मतीसोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी लिहिले - हा अफगाण पत्रकार एकराम इस्मती आहे. काबूलच्या पीडी 5 येथून तालिबानने त्याचे अपहरण केले होते. त्याला मारहाण आणि अपमानित करण्यात आले कारण त्याने जीन्स घातली होती. बेकायदेशीरपणे एकरामचा फोन तपासण्यात आला आणि त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.