त्राहिमाम! पृथ्वीची कक्षा बदलून सुरु होणार विध्वंस, 'या' एका व्यक्तीच्या भाकितानं भरली धडकी

Baba Vanga Predictions 2023: आता पृथ्वीवर नाही होणार रात्र, ही कोणती खगोलीय घटना नाही, तर हे आहे विध्वंसाचं पहिलं पाऊल... संदर्भांसह कोण करतंय हा दावा?  

सायली पाटील | Updated: Sep 22, 2023, 07:12 AM IST
त्राहिमाम! पृथ्वीची कक्षा बदलून सुरु होणार विध्वंस, 'या' एका व्यक्तीच्या भाकितानं भरली धडकी  title=
Baba Vanga Prediction for future Earth will change its orbit other horrifying claims

Baba Vanga Predictions 2023: ज्या गोष्टी जन्माला येतात त्यांचा कधी ना कधी ऱ्हास हा होणार हा सृष्टीचाच नियम आहे. हाच नियम जीवसृष्टीनं परिपूर्ण असणाऱ्या पृथ्वीलाही लागू आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण एक काळ असाही येणार आहे जेव्हा या पृथ्वीवर जीवसृष्टीचा ऱ्हास व्हायला सुरुवात होणार असून, तिची कक्षाही बदलणार आहे. इतकंच नव्हे तर दिवस - रात्रीचं चक्रही थांबणार आहे. विचार करा किती भयावह परिस्थिती असेल.

सर्वत्र त्राहिमाम माजणार असल्याचा दावा करत हे भाकित एका अशा व्यक्तीनं केलं आहे ज्यांची बरीच भाकितं खरी ठरली आहेत. ही व्यक्ती आहे बाबा वेंगा. बल्गोरियातील संन्यासी बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीच्या संदर्भांनी संपूर्ण जगाला विचारात पाडलं आहे. आतापर्यंत त्यांनी सांगितलेल्या अनेक भविष्यवाणी खऱ्याही ठरल्या आहेत. मग तो हिरोशिमा - नागासाकी अणुबॉम्ब हल्ला असो किंवा दुसऱ्या महायुद्धात झालेला नरसंहार असो. अगदी रशिया - युक्रेन युद्धाची भाकितंही त्यांनी केली होती.

5079 वर्षांपर्यतचं भविष्य.... इतकी दिव्य शक्ती?

देहावसान होण्यापूर्वी बाबा वेंगा यांनी 5079 सालापर्यंतची भविष्यवाणी केली. 9/11 हल्ल्यासंदर्भतील त्यांचं भाकित खरं ठरलं आणि अनेकांनीच त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास सुरुवातही केली. 2023 या वर्षासाठीसुद्धा त्यांनी असेच काही इशारे दिले होते. भूकंप म्हणू नका किंवा मग युद्धजन्य परिस्थिती. बाबा वेंगा यांना भविष्यातच्या बऱ्या अप्रिय घटनांची चाहूल लागली होती.

हेसुद्धा वाचा :Maharashtra Rain : राज्याच्या 'या' भागात पावसाळा, तर इथं उन्हाच्या झळा; पाहा हवामान वृत्त

Baba Vanga Prediction for future Earth will change its orbit other horrifying claims

2023 बद्दलची माहिती धडकी भरवणारी...

बाबा वेंगा यांनी 2023 मध्ये पृथ्वीची कक्षा बदलू शकते अशी शक्यता वर्तवली होती. आता पृथ्वीनंच कक्षा बदलली तर नेमका काय आणि कसा विध्वंस होईल याची कल्पनाही करणं अशक्य. इतकंच नव्हे तर, 2028 पर्यंत शुक्रावरही मनुष्याला पोहोचला येईल असं सांगताना त्यांनी एक वेळ अशी येईल जेव्हा पृथ्वीवर रात्रच नसेल असंही सांगितलं होतं. 2100 पर्यंत जीवसृष्टीचं चक्र इतकं बदललं असेल की तोपर्यंत पृथ्वीवर कृत्रिम सूर्यप्रकाशाची मदतही घ्यावी लागू शकते. तर, 2046 पर्यंत माणसाचं आयुर्मान वाढेल, विज्ञानाची प्रगीत होईल पण त्याचे तोटेही सोसावे लागलील अशा शब्दांत त्यांनी सर्वांनाच सतर्क केलं.

5079 पर्यंत तर हे जगच संपुष्टात येईल असं म्हणणाऱ्या बाबा वेंगा यांनी दृष्टी नसतानाही भविष्यातील काही अशा घटना पाहिल्या आणि जगाला सतर्क केलं की ऐकणारेही हैराण होतात.

(वरील माहिती उपलब्ध संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)