युद्धात अझरबैजानचे मोठे नुकसान, 3 हजाराहून अधिक जणांचा मृत्यू

अर्मेनिय आणि अजरबैजान यांच्यात युद्ध सुरु आहे.

Updated: Oct 3, 2020, 08:48 PM IST
युद्धात अझरबैजानचे मोठे नुकसान, 3 हजाराहून अधिक जणांचा मृत्यू title=

मुंबई : रशिया प्रमाणेच अर्धा आशिया आणि अर्धा यूरोप मध्ये येणाऱ्या अर्मेनिय आणि अजरबैजान यांच्यात युद्ध सुरु आहे. या युद्धात अजरबैजानचं मोठं नुकसान झालं आहे. आतापर्यंत 3 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.

ANI च्या माहितीनुसार रिपब्लिक ऑफ आर्तसखचे राष्ट्राध्यक्ष यांचे प्रेस सेक्रेटरी यांनी शनिवारी दावा केला की, इंटेलिजेंस डाटाच्या माहितीनुसार आमचे 3 हजार सर्विसमॅन मारले गेले आहेत. अनेक मृतदेह अशा ठिकाणी आहेत जेथून त्यांना आणणं देखील कठीण आहे.

हे संपूर्ण युद्ध 4400 वर्ग किलोमीटरच्या नागोर्नो काराबाख भागावर ताबा मिळवण्यावरुन सुरु झालं आहे. नागोर्नो काराबाखला आंतरराष्ट्रीय स्तरावर अजरबैजानचा भाग म्हणून ओळखला जातो. पण यावर अर्मेनियाच्या जातीयवादी गटाने ताबा मिळवला आहे. हा वाद 2018 पासून सुरु आहे. जेव्हा दोन्ही देशाचे सैन्य बॉर्डरवर वाढवले गेले होते. आता येथे तणावाचं वातावरण असतानाच युद्ध सुरु झालं. यूरोपमधील अनेक देशांची या दोन्ही देशांना शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवाहन केलं आहे.

अजरबैजानमध्ये असलेल्या या भागात अर्मेनियाचे लोकं अधिक आहेत. त्यामुळे अर्मेनियाच्या सैन्याने हा भाग ताब्यात घेतला. जवळपास चार हजार वर्ग किमीचा हा भाग डोंगराळ भाग आहे. येथे तणावाची परिस्थिती असते. 1991 मध्ये नागोर्नोच्या लोकांनी हा भाग अजरबैजान पासून स्वतंत्र असल्याचं घोषित केलं होतं. त्यानंतर अर्मेनियाने हा भाग मिळवला. तेव्हापासून येथे वाद आणि तणाव निर्माण झाला आहे.

प्रथम विश्व युद्धानंतर 1918 आणि 1921 मध्ये अर्मेनिया आणि अजरबैजान स्वतंत्र झाले होते. हे दोन्ही देश 1922 मध्ये सोवियत यूनियनचे सदस्य झाले. रशियाचे नेते जोसेफ स्टालिन यांनी अजरबैजानचा एक भाग अर्मेनियाला दिला. जो आधी अजरबैजानच्या ताब्यात होता. त्यानंतर दोन्ही देशात वाद सुरु झाले.