व्हाईट हाऊसचे शेफ संपावर, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बाहेरून पिझ्झा, बर्गर मागवण्याची वेळ

 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसचे शेफ संपावर गेले आहेत.

Updated: Jan 16, 2019, 10:30 AM IST
व्हाईट हाऊसचे शेफ संपावर, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बाहेरून पिझ्झा, बर्गर मागवण्याची वेळ  title=

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसचे शेफ संपावर गेले आहेत. त्यामुळे खुद्द राष्ट्राध्यक्षांवर बाहेरचे जेवण मागवण्याची वेळ आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून व्हाईट हाऊसचे शेफ सुट्टीवर गेले आहेत. त्यामुळे व्हाईट हाऊस ठप्प झाले आहे. इथे येणाऱ्या पाहूण्यांना लंच किंवा डिनरच्या ऐवजी पिझ्झा आणि बर्गर सारखे फास्डफूड खायला देण्याची वेळ ट्रम्प यांच्यावर आली आहे. अमेरिका-मेक्सिको बॉर्डरवर भिंत बनवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी संसदेत 40 हजार कोटींची मागणी केली होती. राष्ट्राध्यक्षांची ही मागणी डेमोक्रेटने नाकारली. यासोबतच अमेरिकेत शटडाऊनची घोषणा झाली. सध्याचा शटडाऊन हा अमेरिकेतील सर्वात मोठा शटडाऊन मानला जातोय. माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या कार्यकाळातील सर्वात मोठा शटडाऊन 21 दिवसांचा होता. आता ट्रम्प यांच्या कार्यकाळातील शटडाऊन 23 व्या दिवसावर पोहोचला आहे.

Image result for trump zee news

डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या डायनिंग रुममध्ये येणाऱ्या पाहुण्यांसाठी पिझ्झा, बर्गर आणि फ्रेंच फ्राईज अशा फास्ट फूडची सोय केली आहे. राष्ट्राध्यक्षांनी ही ऑर्डर आपल्या स्वखर्चाने केली आहे. याचे कोणतेही बिल व्हाईट हाऊसच्या नावे नसणार आहे. राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर शेजारचा देश मेक्सिकोमधून अवैध मार्गाने होणारा प्रवेश रोखण्यासाठी मोठी भिंत बांधणार असल्याचे आश्वासन ट्रम्प यांनी दिले होते.

Image result for trump zee news

राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर ट्रम्प यांनी या दिशेने पाऊले उचलण्यास सुरूवात केली. यासाठी अतिरिक्त बजेटची मागणी त्यांनी सदनात केली. ज्याला जोरदार विरोध झाला. यानंतर अमेरिकेत शटडाऊन सुरू झाला. हजारो सरकारी कर्मचाऱ्यांना खर्चाच्या अडचणी येऊ लागल्या आहेत. गेले 22 दिवस त्यांना कोणत्याही प्रकारचे वेतन मिळाले नाही. गेल्या आठवड्यात अमेरिकेतील 8 लाख कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही. ज्यानंतर लाखो कर्मचारी सुट्टीवर गेले तर काहीजण विनापगाराचे मजबूरीने काम करत आहेत.