कोरोना व्हायरसवरील लसीच्या संशोधनात अमेरिकेला मोठं यश

कोरोना व्हायरस साऱ्या जगात थैमान घालत असतानाच संशोधकांचे अनेक गट या विषाणूचा नायनाट करणाऱ्या औषधाच्या संशोधनात स्वत:ला झोकून देताना दिसत आहेत. याच संशोधकांच्या प्रयत्नांना आता यश मिळतानाही दिसत आहे. त्यामुळं साऱअया जगाला जणू आशेचा किरण मिळाला आहे. 

Updated: Jul 15, 2020, 09:50 PM IST
कोरोना व्हायरसवरील लसीच्या संशोधनात अमेरिकेला मोठं यश  title=
छाया सौजन्य- रॉयटर्स

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरस साऱ्या जगात थैमान घालत असतानाच संशोधकांचे अनेक गट या विषाणूचा नायनाट करणाऱ्या औषधाच्या संशोधनात स्वत:ला झोकून देताना दिसत आहेत. याच संशोधकांच्या प्रयत्नांना आता यश मिळतानाही दिसत आहे. त्यामुळं साऱअया जगाला जणू आशेचा किरण मिळाला आहे. 

अमेरिकेत coronavirus कोरोना प्रतिबंधक लसीच्या संशोधनात मोठं यश मिळाल्याचा दावा मॉडर्ना या अमेरिकन बायोटेक कंपनीनं केला आहे. मॉडर्नानं तयार केलेली ही लस पहिल्या टप्प्यात यशस्वी झाली आहे. निरोगी असणाऱ्या ४५ स्वयंसेवकांवर या लसीची चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये मानवी शरीर रोगप्रतिकारक शक्तीला चालना देत असल्याचं आढळून आलं. 

कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस शोधतेवेळी यादरम्यान काही साईड इफेक्टही दिसून आले. पण, ते फार गंभीर स्वरुपाचे नसल्याचं मॉडर्नाकडून सांगण्यात आलं. एकिकडे मॉडर्नाच्या या यशस्वी कामगिचीनं साऱ्या जगाला आशेचा किरण दाखवला असतानाच दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट करत सर्वांचं लक्ष वेधलं. 'ग्रेट न्यूज ऑन वॅक्सिन', असं ट्विट त्यांनी केलं. 

ट्रम्प यांनी केलेलं हे ट्विट आणि मॉडर्नाच्या संशोधनातील हा महत्त्वाचा टप्पा पाहता आता राष्ट्राध्यक्षांकडून नेमकी कोणती महत्त्वाची घोषणा केली जाणार याकडेच साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

 

आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष अविनाश भोंडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार या लसीच्या चाचणीचे तिन्ही टप्पे अतिशय महत्त्वाचे असल्याचं प्रतिक्रिया दिली. पण, कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता चाचणीच्या टप्प्यांमध्ये जास्त वेळ न दवडता तीन ते सहा आठवड्यांमध्ये ही लस बाजारात येणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला.