सप्टेंबरपासून हाँगकाँगमध्ये बनणाऱ्या वस्तूंवर लागणार Made in Chinaचं लेबल

 हाँगकाँगमध्ये तयार होणाऱ्या सर्व वस्तूंवर Made in Hong Kongच्या ऐवजी Made in Chinaचं लेबल लावण्यात येणार आहे.

Updated: Aug 11, 2020, 08:22 PM IST
सप्टेंबरपासून हाँगकाँगमध्ये बनणाऱ्या वस्तूंवर लागणार Made in Chinaचं लेबल title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : चीन आणि अमेरिकेत आधीपासूनच सुरु असेलल्या वादात आता आणखी एक भर पडली आहे. मंगळवारी अमेरिकी सरकारच्या एका नोटिशीनुसार, 25 सप्टेंबरपासून हाँगकाँगमध्ये तयार होणाऱ्या सर्व वस्तू, ज्या अमेरिकेत निर्यात करण्याच्या उद्देशाने बनवण्यात आल्या आहेत, त्या सर्व वस्तूंवर Made in Hong Kongच्या ऐवजी Made in Chinaचं लेबल लावण्यात येणार आहे.

हाँगकाँगमध्ये चीनच्या विवादित राष्ट्रीय सुरक्षा कायद्याची (नॅशनल सिक्योरिटी लॉ) अंमलबजावणी करण्याबाबत, दोन देशांमध्ये तणावग्रस्त वातावरण असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. हा कायदा हाँगकाँगमध्ये लागू करण्याचा परिणाम असा झाला की, अमेरिकेने या पूर्व ब्रिटीश वसाहतीचा विशेष दर्जा रद्द केला. ज्यावेळी, दोन देशांमधील संबंधांमध्ये आधीच तणाव निर्माण झाला होता आणि कोरोनामुळे अमेरिकेकडून, चीनवर टीका करण्यात येत होती, त्यावेळी हे सर्व झाल्याचं बोललं जात आहे.

त्यानंतर अमेरिकी सीमा शुल्क विभाग आणि सीमा सुरक्षा नोटिसनुसार, हाँगकाँगच्या कंपन्यादेखील चिनी कंपन्यांकडून आकारला जाणारा 'वॉर टॅरिफ' वसूल करेल. आतापासून 45 दिवसांनंतर सर्व वस्तू ज्या हाँगकाँगमधून अमेरिकेत येतील, त्या सर्वांवर मेड इन चायनाचा मार्क लावण्यात येईल.