'या' गुप्त ठिकाणी ठेवलाय Alien चा मृतदेह? शास्त्रज्ञ करतायत त्यावर संशोधन

गुगल मॅपवर या ठिकाणाचे काही फोटो आहेत.

Updated: Jul 14, 2022, 11:12 AM IST
'या' गुप्त ठिकाणी ठेवलाय Alien चा मृतदेह? शास्त्रज्ञ करतायत त्यावर संशोधन title=

मुंबई : जगात अशी अनेक रहस्यमयी ठिकाणं आहेत, ज्याबद्दल अनेक प्रकारच्या कथा व्हायरल आहेत. मात्र, त्यांच्याबाबत कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. असंच एक रहस्यमय ठिकाण लास वेगासपासून काही अंतरावर आहे. हे ठिकाण एरिया 51 म्हणून प्रसिद्ध आहे. हे एक रहस्यमय ठिकाण आहे. 

मात्र परंतु याबाबत कोणत्याही प्रकारचा फोटो समोर आलेला नाही. गुगल मॅपवर या ठिकाणाचे काही फोटो आहेत. असं म्हटलं जातं की, एरिया 51 हे असं ठिकाण आहे, जिथे अनेक हेरगिरीची कामे केली जातात. शस्त्रं, विमानं अशा शस्त्रांची चाचणी घेतली जाते. यासोबतच हे ठिकाण एलियंसच्या कथाही प्रसिद्ध आहेत.

हे ठिकाण नेहमीच ठेवलं जातं गुप्त

एरिया 51 नेवाडाच्या दक्षिण भागात लास वेगासच्या वायव्येस 83 मैल आहे. ही जागा नेहमीच गुप्त ठेवण्यात आली होती. असं म्हटलं जातं की, हा एक एअरबेस आहे, जो सामान्यतः विमाने आणि शस्त्रास्त्रांच्या चाचणीसाठी वापरला जातो. त्याला स्पाय वेपन्स लॅब असंही म्हणतात. अमेरिकन हवाई दलाने ते 1955 मध्ये विकत घेतलं. सीआयएने नेहमीच अशी कोणती साईट असल्याचं नाकारलं आहे.

एरिया 51 मध्ये एलियन आहेत?

कॉन्सपिरेसी थिअरीटा असा विश्वास आहे की, या तळाचा वापर क्रॅश झालेल्या एलियन विमानाची साठवण, चाचणी आणि दुरुस्ती करण्यासाठी केला जातो. 1950 साली झालेल्या रोझवेल दुर्घटनेचं साहित्यही ठेवण्यात आलंय. रोसवेल ही घटना न्यू मेक्सिकोच्या रोसवेल जवळील एका शेतात घडली. हा यूएस एअरफोर्सचा मोठा फुग्याप्रमाणे गोलाकार तुकडा असल्याचं सांगण्यात येत होतं. पण नंतर तो फ्लाइंग सॉसर असल्याचा दावा केला आणि अमेरिकेने हे सत्य लपवलंय.

एलियंसचा मृतदेह

हा एअरबेस इतका गुप्त ठेवण्यात आला आहे की त्यामुळे अनेक अफवा पसरल्या आहेत. रॉसवेल घटनेशीही त्याचा संबंध आहे. 

हिस्ट्री डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, रॉसवेल्झ यूएफओ क्रॅशमध्ये मारल्या गेलेल्या एलियनचा मृतदेह याठिकाणी ठेवण्यात आला असल्याचं जातं. 1989 मध्ये रॉबर्ट लेजर नावाच्या व्यक्तीने एलियन 51 मध्ये एलियन तंत्रज्ञानावर काम करत असल्याचा दावा केला होता. मृत एलियनचे फोटोही पाहिल्याचा दावाही त्यांनी केला.