Sleep Job: ऑफिसला या आणि गादीवर झोपा, या कंपनीत मजेदार नोकरी! मिळेल मोठा पगार

 Sleep Jobs: जगात आरामशीर नोकरी कोणाला करायला आवडणार नाही. आता एका अमेरिकन कंपनीने असे काम हाती घेतले आहे, ज्यामध्ये फक्त मजाच आहे. या कंपनीत नोकरीसाठी ज्या कोणाची निवड होईल, त्याला ऑफिसमध्ये येताच झोपण्यासाठी एक मस्त गादी दिली जाईल. 

Updated: Aug 10, 2022, 08:59 AM IST
Sleep Job: ऑफिसला या आणि गादीवर झोपा, या कंपनीत मजेदार नोकरी! मिळेल मोठा पगार title=

मुंबई : Sleep Jobs: जगात आरामशीर नोकरी कोणाला करायला आवडणार नाही. आता एका अमेरिकन कंपनीने असे काम हाती घेतले आहे, ज्यामध्ये फक्त मजाच आहे. या कंपनीत नोकरीसाठी ज्या कोणाची निवड होईल, त्याला ऑफिसमध्ये येताच झोपण्यासाठी एक मस्त गादी दिली जाईल. या गादीवर त्याला पुरेशी झोप घ्यावी लागेल. झोप पूर्ण झाल्यावर ती व्यक्ती त्याच्या घरी जाईल. त्या बदल्यात त्याला दर महिन्याला मोठा पगारही मिळेल. 

या अमेरिकन कंपनीने हाती घेतले काम  

ज्या कंपनीने हे अनोखे काम हाती घेतले त्या कंपनीचे नाव आहे कॅस्पर. गाद्या बनवण्याचे काम ही कंपनी करते. या कंपनीला त्यांनी बनविलेल्या गादीचा दर्जा तपासणारा हवा आहे. म्हणजे असा माणूस, जो गादीवर झोपताच गाढ झोपू शकतो किंवा काही क्षणात त्याला चांगली झोप मिळेल. या पदासाठी त्याच व्यक्तीची निवड केली जाईल, ज्याला भरपूर झोप मिळेल, असे कंपनीचे म्हणणे आहे.

ड्युटीवर झोपावे लागते

कंपनीच्या मजेदार नियम आणि अटींनुसार, नोकरीसाठी निवडले जाणारे उमेदवार ड्युटीवर असताना पायजमा घालून झोपू शकतात. त्यांना झोपण्यासाठी रोज नवीन गाद्या दिल्या जातील. त्यांना कामाच्या वेळेतही सवलत दिली जाईल. 

18 वर्षांवरील तरुण अर्ज करु शकतात

या पदासाठी 18 वर्षांवरील तरुण अर्ज करु शकतात, असे कंपनीचे म्हणणे आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑगस्ट आहे. कंपनीच्या अटींनुसार, ज्या तरुणांना या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्यांना 'स्लीप स्किल'चा एक छोटा व्हिडिओ बनवावा लागेल आणि तो अर्जासोबत पाठवावा लागेल. या व्हिडिओमध्ये त्याला नवीन गादीवर झोपताना कसे वाटले हे सांगायचे आहे.