ब्रिटेन : प्रेमाला कोणतीचं बंधन नसतात. प्रेम एक चिराकाल टिकणारी भावना आहे. त्यामुळे आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्यासाठी कोणतही पाऊल उचलण्यासाठी तयार होतो. प्रेमाला वयाचं देखील अंतर नसतं. असचं एक प्रकरण सध्या समोर आलं आहे. अवघ्या 20 वर्षांच्या मुलीला चक्क 77 वर्षांच्या वृद्ध पुरूषासोबत लग्न करायचं आहे. ही तरूणी तिच्या प्रेमी शिवाय राहण्यासाठी तयार नाही. दोघं देखील एकमेकांवर प्रचंड प्रेम करतात.
हे प्रकरण ब्रिटेनच्या म्यानमारमधील आहे. मुलगी म्यानमारमधील आहे, तर वृद्ध पुरूष ब्रिटनमधील आहे. 20 वर्षांच्या तरूणीचं नाव जो असं आहे. 77 वर्षांच्या वृद्ध पुरूषाचं नाव डेविड असं आहे. 'द सन'मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार तरूणीला वृद्ध पुरूषासोबत लग्न करायचं आहे.
जोच्या म्हणण्यानुसार, दोघेही एकमेकांपासून खूप दूर राहतात. त्यांची भेट ऑनलाईन झाली. आधी दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर त्यांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघेही एकमेकांना डेट करू लागले.
जो पुढे म्हणाली , डेव्हिड संगीत दिग्दर्शक आहेत. त्यांना मुले नाहीत. वयात अंतर आहे पण त्यांचं वय आमच्या मधील प्रेम कमी करू शकत नाही. मुलीने सांगितले की सुमारे 2 वर्षांपूर्वी ती एका व्यक्तीच्या शोधात होती. जो तिच्यासाठी एक मार्गदर्शक बनू शकेल. आर्थिक मदतही करू शकतो.
आता जो आणि डेव्हिडने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण जोकडे अद्याप पासपोर्ट नाही. पासपोर्ट तयार होताचं जो आणि डेव्हिड लग्न करणार आहेत.