नवी दिल्ली : पूर्वेकडील देश नायजेरियामध्ये एका मस्जिदमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यात जवळपास ५० लोकांचा मृत्यू झाला आहे.
नायजेरियातील एडमवा राज्यात एका दहशतवाद्याने स्वत:ला बॉम्बने उडवलं आहे. जेव्हा लोकं मस्जिदमध्ये सकाळच्या प्रार्थनेसाठी जात होते तेव्हा ही घटना घडली.
पोलिसांनी सांगितलं की, या हल्ल्यात मृतांची संख्या वाढू शकते. या हल्ल्याची जबाबदारी अजून कोणत्याही दहशतवादी संघटनेनी घेतलेली नाही. पण बोको हरम या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केल्याची शंका आहे.