न्यूयॉर्क : अमेरिकेत भारतीय वंशाच्या ४ जणांची हत्या करण्यात आली आहे. अमेरिकेच्या सिनसिनाटी शहरात ही घटना घडली आहे. मृतांमध्ये एक भारतीय नागरिक आहे. जो अमेरिकेत फिरायला गेला होता. इतर तीन मृत अमेरिकेत स्थायिक भारतीय वंशांचे आहेत.
Indian Ambassador in United States @IndianEmbassyUS has informed me about the killing of four persons in Cincinnati on Sunday evening. One of them was an Indian national on a visit to US while others were persons of Indian origin. /1
— Chowkidar Sushma Swaraj (@SushmaSwaraj) April 30, 2019
मृतांबाबत अधिक माहिती कळू शकलेली नाही. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या घटनेला ट्विट करून दुजोरा दिला आहे. अमेरिकन पोलीस घटनेचा अधिक तपास करत असून न्यूयॉर्कमधील भारतीय दुतावास त्यांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे.
The matter is under investigation by the Police but it is not a hate crime. Our Consul General in New York is coordinating with the concerned authorities and will keep me informed me on this. @IndiainNewYork /2
— Chowkidar Sushma Swaraj (@SushmaSwaraj) April 30, 2019