अल्बर्ट आईन्स्टाईन आणि स्टिफन हॉकिंगपेक्षा भारतीय वंशाच्या माहीचा बुद्ध्यांंक अधिक

एकीकडे क्रिकेटच्या मैदानावर 'माही' म्हणजेच महेंद्रसिंग धोनी आपल्या तुफान फटकेबाजीसाठी,'कूल कॅप्टन' म्हणून प्रसिद्ध आहे. तर दुसरीकडे 10 वर्षीय 'माही'नेदेखील जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. 

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Jan 27, 2018, 10:29 AM IST
अल्बर्ट आईन्स्टाईन आणि स्टिफन हॉकिंगपेक्षा भारतीय वंशाच्या माहीचा बुद्ध्यांंक अधिक  title=

मुंबई : एकीकडे क्रिकेटच्या मैदानावर 'माही' म्हणजेच महेंद्रसिंग धोनी आपल्या तुफान फटकेबाजीसाठी,'कूल कॅप्टन' म्हणून प्रसिद्ध आहे. तर दुसरीकडे 10 वर्षीय 'माही'नेदेखील जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. 

बुद्धिमान 'माही'  

माही हा ब्रिटनमधील भारतीय वंशाचा 10 वर्षीय मुलगा आहे. अभ्यासात 'माही'च्या बुद्ध्यांक  पाहून अनेकजण आवाक झाले आहेत.मेनसा आयक्यू टेस्टमध्ये माहीचा बुध्यांक हा अल्बर्ट आईन्स्टाईन आणि स्टीफन हॉकिंगपेक्षाही अधिक आहे. 

बुद्ध्यांक किती ? 

मेहुल गर्गला त्याचे कुटुंबीय 'माही' या नावाने हाक मारतात. मेहुलने त्याच्या 13 वर्षीय भावाच्या पावलांवर पाऊल टाकत या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. मागील वर्षी धुव्र गर्गने 162 अंकांसह सर्वाधिक स्कोर केला होता. धुव्रप्रमाणेच मेहुलचा बुध्यांकदेखील 162 आहे. 

गर्ग बंधूचा सामाजिक उपक्रम  

मेहुल आणि ध्रुव गर्ग हे दोघं केवळ अभ्यासू किडे नाहीत. जगात आपल्या ज्ञानाचा फायदा होण्यासाठी दोघेही अनेक सामाजिक उपक्रम राबवतात. ऑनलाईन स्वरूपात त्यांनी 1300 पाऊंड जमा केले आहेत. 

'Child Genius 2018' लक्ष्य 

मेहुल (माही) हा सद्ध्या Child Genius 2018'साठी तयारी करत आहे. हा कार्यक्रम चॅनेल 4 वर प्रसारित होतो. या कार्यक्रमातील टॉप 100 मुलांमध्ये त्याची निवड झाली आहे.