मुंबई : डॉ. सीमा राव हे नाव कदाचीत सर्वसामान्यांना फारसे परिचीत नसेन. पण, लष्करातील हजारो जवांनांना मात्र हे नाव चांगलेच परिचित आहे. डॉ. सीमा राव या देशातील पहिल्या आणि एकमेवर महिला कमांडो ट्रेनर आहेत. ज्या कमांडोंना प्रशिक्षण देतात. आतापर्यंत त्यांनी तब्बल २० हजार कमांडोंना प्रशिक्षण दिल्याचे सांगितले जाते.
विशेष असे की, डॉ. सीमा राव या कमांडोंना दिलेल्या प्रशिक्षणासाठी एक रूपयाही पगार अथवा मानधन घेत नाही. त्या पूर्णपणे मोफत प्रशिक्षण देतात. त्यांनी मार्शल आर्ट्समध्येही ब्लॅक बेल्ट मिळवला आहे. त्या जगभरातील १० महिलांपैकी एक आहेत. ज्यांनी 'जीत कुने दो' अत्मसात केले आहे. हा एक मार्शल आर्टमधीलच पण अत्यंत अवघड असा प्रकार आहे. हा प्रकार ब्रुसलीनेही शिकला होता.
डॉ. सीमा यांचे वेशिष्ट्य असे की, त्या ३० यार्डातील रेंजमध्ये कोणत्याही प्रकारच्या शत्रूवर अचूक निशाणा साधू शकतात.
दरम्यान, डॉ. सीमा राव या सध्या ४९ वर्षांच्या आहेत. त्यांचा जन्म मुंबईतील वांद्रे येथे झाला. त्यांचे वडील प्रो. समाकांत सिनारी हे एक फ्रीडम फायटर होते. गोव्यात पोर्तुगिजांसोबत झालेल्या संघर्षात मोठी भूमिका सांभाळली होती. आपल्याला देशसेवेची भावना घरातील परंपरेनेच मिळाली आहे. जेव्हा आम्हाला वेळ असे तेव्हा माझे वडील मला स्वतंत्र्याच्या लढाईचे प्रसंग सांगत. घरात आम्ही तीनच बहिणी होतो. ज्यात मी सर्वात छोटी होते.
मला डॉक्टर बनायचे होते. पण, लहानपनापासूनच शूटींगची आवड असल्याने डॉक्टर बनू शकले नाही. पण, मेडिकल कॉलेजमधून एमडी पर्यंतचे शिक्षण जरूर पूर्ण केल्याचे डॉ. राव आवर्जून सांगतात.