चुटकी म्हणजेच क्रॅकिंग वाजवण्याचा आरोग्याला फायदा?

चुटकी म्हणजेच क्रॅकिंग वाजवण्याचा आरोग्याला फायदा आहे? असं म्हटलं तर अनेकांचा विश्वास बसत नाही. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 9, 2017, 05:45 PM IST
चुटकी म्हणजेच क्रॅकिंग वाजवण्याचा आरोग्याला फायदा? title=

मुंबई : चुटकी म्हणजेच क्रॅकिंग वाजवण्याचा आरोग्याला फायदा आहे? असं म्हटलं तर अनेकांचा विश्वास बसत नाही. 

अनेक वेळा चुटकी वाजवून बोलतात

काही लोक काम करताना अनेक वेळा चुटकी वाजवून बोलतात. ही सवय वाईट मानली जाते. चुटकी वाजवल्याने तुमचं वाईट इम्प्रेशन पडतं हे देखील तेवढंच सत्य आहे, तेव्हा कुणाशी बोलताना चुटकी वाजवून, ऑर्डर केल्यासारखं बोलू नका.

मात्र या सवयीपासून लांब राहा

वडीलधारी माणसे या सवयीपासून लांब राहण्याचे सांगतात, पण ही सवय स्नायू आणि सांध्यांसाठी चांगला व्यायाम प्रकार आहे. तेव्हा एकांतात असताना, व्यायाम म्हणून चुटकी वाजवा.

सांध्यांवर चुटकीचा चांगला परिणाम

सांध्यामध्ये सिनोविअल फ्लूड असते. चुटकी वाजवल्याने त्यावर दबाव पडतो आणि त्या द्रवात हवेचे बुडबुडे तयार होतात. त्यामुळेच आवाज निर्माण होतो.

साध्यांना मिळतो आराम

चुटकी वाजवल्याने सांध्यांना आराम मिळतो तसेच त्यांचा लवचीकपणा वाढतो. या सवयीमुळे बोटांच्या सांध्यांना कोणतीही इजा होत नाही, असा तज्ज्ञांचा दावा आहे.