तुम्हाला माहितीयेत का ब्रेस्ट मसाज करण्याचे फायदे?

आज जाणून घेऊया स्तनांच्या समाजमुळे होणारे फायदे

Updated: Apr 4, 2022, 03:42 PM IST
तुम्हाला माहितीयेत का ब्रेस्ट मसाज करण्याचे फायदे? title=

मुंबई : स्तनांचा मसाज करणं खूप फायदेशीर आहे. मुळात महिला सहजपणे स्वतः हा समाज करू शकता. स्तनांना मसाज केल्याने रक्तप्रवाह सुधारतो. त्याचप्रमाणे स्तनपान देणाऱ्या मातांसाठी हे खूप फायदेशीर आहे. नियमितपणे मसाज केल्यास स्तनांचा विकास होण्यास मदत होते. शिवाय त्यामुळे तुमचा ताण कमी होतो. तर आज जाणून घेऊया स्तनांच्या समाजमुळे होणारे फायदे- 

तणाव कमी होतो

स्तनांना मसाज केल्याने स्त्रिया त्यांचा ताण, चिंता यांची पातळी कमी करू शकतात. शिवाय तुम्हाला शांत राहण्यास मदत होते. नियमितपणे स्तनाची मालिश करून तुम्ही तणावमुक्त राहू शकता. 

ब्रेस्ट कॅन्सरची ओळख होते

स्तनांना नियमितपणे मसाज केल्याने तुम्ही सुरुवातीच्या टप्प्यात असलेला ब्रेस्ट कॅन्सर ओळखू शकता. जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर होतो तेव्हा स्तनांवर गाठ लागते. अशा स्थितीत स्तनाचा नियमित मसाज केल्यावर तुमच्या हाताला ही गाठ लागू शकते. याने स्तनाचा कर्करोग लवकर ओळखता येतो. 

ब्रेस्ट मिल्कचं उत्पादन वाढतं

स्तनांची मालिश केल्याने स्तनांच्या आसपासच्या भागात रक्ताभिसरण होण्यास मदत होते. तसंच मालिशमुळे स्तनांमध्ये काही प्रमाणात उष्णता वाढत असल्याने स्तनांचे टिश्यू लूज होण्यास मदत होते. यामुळे स्तनांमध्ये दूध तयार होण्याची प्रक्रिया चांगली होते.