पुण्यात संग्राम थोपटेंच्या कार्यकर्त्यांचा राडा; काँग्रेस भवनाची तोडफोड

कालच्या मंत्रिमंडळ विस्तारात संग्राम थोपटे यांना स्थान न मिळाल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले होते.

Updated: Dec 31, 2019, 07:17 PM IST
पुण्यात संग्राम थोपटेंच्या कार्यकर्त्यांचा राडा; काँग्रेस भवनाची तोडफोड title=

पुणे: मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज झालेले काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांच्या समर्थकांनी मंगळवारी पुण्यात राडा घातला. थोपटेंच्या समर्थकांकडून शिवाजीनगर येथील काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. कालच्या मंत्रिमंडळ विस्तारात संग्राम थोपटे यांना स्थान न मिळाल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले होते. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच भोर मतदारसंघात तणावाचे वातावरण होते. 

अखेर आज दुपारच्या सुमारास या संतापाचा उद्रेक झाला. संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर येथील काँग्रेसच्या कार्यालयात घुसून सामानाची तोडफोड केली. त्यामुळे आता पुण्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. 

मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेनेचे हे ६ आमदार नाराज

पुणे शहर व जिल्हा कार्यालय शिवाजीनगर येथे एकाच इमारतीत आहेत. याठिकाणी संग्राम थोपटे यांच्या समर्थकांनी सुरुवातीला घोषणाबाजी केली. यानंतर अचानक दगडफेक सुरु झाली. थोपटेंच्या काही समर्थकांनी कार्यालयात येत तोडफोड सुरु केली. त्यांनी शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या कार्यालयातील खुर्च्या, टेबलवरच्या काचा, खिडक्या फोडल्या. दगड मारून टीव्हीही फोडला. 

महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर इच्छुकांची नाराजी उफाळून आली आहे. या आमदारांची समजूत काढताना नेत्यांची पुरती दमछाक होत आहे. ठाकरे सरकारचा शपथविधी झाल्यानंतर मंत्रिपदाची आशा बाळगून असलेले अनेक नेते नाराज झालेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये नाराजांचे प्रमाण आहे.

नाराज आमदारांची समजूत काढताना महाविकासआघाडीच्या नेत्यांची दमछाक