इचलकरंजी : इचलकरंजीमधील जवाहरनगर भागातल्या डॉ. अरुण पाटील यांच्या हॉस्पिटलवर केंद्रीय पथकानं धाड टाकलीय.
या ठिकाणी कुमारी मातांची प्रसुती बेकायदेशीरपणं केली जात असल्याचं उघड झालंय. इतकंच नव्हे तर या कुमारी मातांना दोन लाख रुपये देऊन ही बालकं डॉ. पाटील विकत घेत असे आणि नंतर त्या बालकांची विक्री करत असे, असा गंभीर प्रकार समोर आलाय.
यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडालीय. केंद्रीय दत्तक प्राधिकरण विभाग, जिल्हा महिला आमि बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती यांच्या संयुक्त पथकानं ही धाड टाकली.
प्राथमिक तपासात छत्तीसगड आणि मुंबईमध्ये दोन बाळांची विक्री झाल्याची माहिती समोर आलीय.
पथकानं डॉ. पाटील यांच्या हॉस्पीटलमधील सर्व कागदपत्रे जप्त केलीत. या प्रकरणी डॉ. अरुण पाटील, त्यांची पत्नी, हॉस्पीटलमधील कर्मचाऱ्यांना या प्रकरणी ताब्यात घेतले असून शिवाजीनगर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय.