दूध आंदोलनाचा भडका; वाशीममध्ये ट्रकला लावली आग

चालक ट्रकमध्ये बसलेला असतानाच आंदोलकांनी ट्रकवर रॉकेल ओतले.

Updated: Jul 16, 2018, 07:37 PM IST
दूध आंदोलनाचा भडका; वाशीममध्ये ट्रकला लावली आग title=

वाशीम: दूध आंदोलनाला वाशीम जिल्ह्यातील मालेगाव इथे हिंसक वळण लागले. शेतकरी स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दूध वाहून नेहणाऱ्या राजहंस कंपनीच्या ट्रकला चक्क आग लावली. विशेष म्हणजे यावेळी ट्रक चालक गाडीतच बसून होता. मात्र, या चालकाला खाली उतरू देण्याचंही सौजन्य आंदोलकांनी दाखवले नाही. हा चालक ट्रकमध्ये बसलेला असतानाच आंदोलकांनी ट्रकवर रॉकेल ओतलं आणि थेट पेटवून दिला.

त्यानंतर घाबरलेल्या हा चालक  दुसऱ्याबाजुनं जीव मुठीत घेऊन उतरला. या घटनेमुळे मालेगाव औरंगाबाद महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. ट्रकचालक आणि गावकऱ्यांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यात आली. 

सोलापूरमध्ये शेतकऱ्याची दुधाने आंघोळ

 

दूध दरवाढीच्या आंदोलनाच्या नावाखाली काहींनी दूध उत्पादकांची थट्टा मांडलीय. सोलापूरमध्ये अशाच एका कार्यकर्त्यांनं चक्क स्वत: दुधानं अंघोळ केली. सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातल्या सागर सुरेश लेंडवे यांनी  ३५ लीटर दुधानं अंघोळ केलीय. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या गुरांनाही दुधानं अंघोळ घातली. दूध दरवाढ व्हायला हवी. मात्र काही कार्यकर्त्यांच्या असल्या संतापजनक प्रकारामुळे आंदोलनं बदनाम होत असल्याचा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.