जिलेबी भरवत देवेंद्र फडणवीस यांना पत्नीकडून हटके शुभेच्छा, ट्वीट होतंय व्हायरल

 उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना देशभरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. 

Updated: Jul 22, 2022, 02:07 PM IST
जिलेबी भरवत देवेंद्र फडणवीस यांना पत्नीकडून हटके शुभेच्छा, ट्वीट होतंय व्हायरल title=

मुंबई : उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना देशभरातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर समर्थकांकडूनही शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. मात्र या सगळ्यात चर्चा आहे ती त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या हटके ट्वीटची. 

देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी जिलेबी भरवतानाचा फोटो शेअर केला. या फोटोसोबत त्यांनी हटके कॅप्शन दिलं आहे. ''जिलेबी कितीही आडवळणी असो, तिची चव कायम गोडच असते. ''

''अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी कितीही आडवळणे आली तरी, अडथळ्यांची शर्यत पार करीत, त्यातून सुखद वाट सातत्याने शोधत-कायम विकासाचा गोडवा पसरविणारे देवेंद्र फडणवीसजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ! ''

 

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील ट्वीट करून देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सागर निवासस्थानी आमदार प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी त्यांची भेट घेतली. तर शिंदे गटातील आमदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी संजय राठोड, दादा भुसे, संदीपने भुमरे यांनीही भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.