चंद्रपूर: 'माझ्यावर भरोसा नाय का' या गाण्याचा विडंबनात्मक वापर करुन मुंबई महानगरपालिकेवर टीका करणाऱ्या आर.जे. मलिष्काचा व्हीडिओ मध्यंतरी बराच गाजला होता. हाच फंडा वापरून आता चंद्रपुरातील काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी भाजप सरकारचे वाभाडे काढले आहेत. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
गेल्याच आठवड्यात चंद्रपूर शहरात खड्ड्यांमुळे दोन नागरिकांची बळी गेला होता. याचा निषेध करण्यासाठी अशी अनोखी पद्धत काँग्रेसने अवलंबली. खोल खड्ड्याव्यतिरिक्त अपयशी दारूबंदी आणि फोल आश्वासने यावरही या व्हिडिओतून तिरकस टीका करण्यात आली. आता सोशल मीडियावर सतत सक्रिय असणारे भाजप कार्यकर्ते या बोच-या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.