तामिळनाडू : TAMILNADU CRIME NEWS : तामिळनाडू पोलिसांनी ( TAMIL NADU POLICE ) सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या कार्तिक गोपीनाथ याला अटक केली आहे. गोपीनाथ हा 'इलया भारतम' यूट्यूब चॅनल चालवायचा. अरविंदन यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कार्तिक गोपीनाथला अटक केली.
खरं तर, पेरम्बलूरमधील अरुल्मिगु मधुरा कालियाम्मन थिरुकोइलचे कार्यकारी अधिकारी टी अरविंदन यांनी तक्रार केली होती. कार्तिक गोपीनाथ याने 'इलया भारतम' यूट्यूब चॅनल उघडल्याचा आरोप आहे. या वाहिनीच्या माध्यमातून कार्तिकने सिरवाचूर मधुराकाली मंदिराच्या नावावर निधी गोळा करुन निधीचा गैरवापर केला.
मंदिराच्या नावावर गोळा केलेल्या निधीचा कार्तिक गोपीनाथ याने स्वत:च्या मायद्यासाठी दुरुपयोग केल्याचेही फिर्यादीत म्हटले होते. त्याआधारे केंद्रीय गुन्हे शाखेने भादंवि कलम 406, 420 अन्वये गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.