तासाभरानंतर You Tube, Google ची सेवा पुन्हा सुरु

YouTube ची सेवा काही मिनिटांपासून तांत्रिक कारणांमुळे बंद झाली आहे. Google चा YouTube हा सर्वात मोठा 

Updated: Dec 14, 2020, 06:24 PM IST
तासाभरानंतर You Tube, Google ची सेवा पुन्हा सुरु title=

मुंबई : YouTube ची सेवा आज १४ डिसेंबर २०२० रोजी, साधारण तासभर बंद होती, भारतात दुपारी ५ नंतर बंद झालेली ही सेवा ६ वाजून ५ मिनिटांनी सुरु झाली. जगभरात काही ठिकाणी ही सेवा बंद होती, या पाठोपाठ गूगल आणि गूगलमीटची सेवा देखील बंद होती, यामुळे YouTube दिसत नाहीय, सेवा का बंद आहे, यावर जगभरात अनेक ठिकाणी चर्चा सुरु आहे. न्यूज एजन्सी रायटरने दिलेल्या वृत्तानुसार पहिल्या टप्प्यात १२ हजार लोकांना याचा फटका बसला आहे. हा आकडा तसा कमी वाटत असला तरी लवकरच अपडेट आकडा येणार आहे.

जेव्हा YouTube  तासभर बंद पडलं

YouTube ची सेवा काही मिनिटांपासून तांत्रिक कारणांमुळे बंद झाली आहे. Google चा YouTube हा सर्वात मोठा व्हीडीओ प्लॅटफॉर्म आहे. यामुळे अनेक ठिकाणी युझर्स, सब्सस्क्राईबर्स गोंधळात पडले आहेत. यूट्यूब क्रिएटर्सना देखील याचा धक्का बसला आहे. YouTube अनेक वेळा तांत्रिक दुरुस्ती असल्यासं YouTube क्रिएटर्सना कळवत असतं, पण यावेळी असं काहीही कळवण्यात आलेलं नाही. YouTube काय तांत्रिक अडचण अचानक आली आहे, याविषयी google कडून काहीही कळवण्यात आलेलं नाही.

YouTube वर सध्या जगभरात सर्वात जास्त प्रेक्षक इतर प्लॅटफॉर्मपेक्षा आहेत, फेसबूक देखील You Tubeच्या व्हीडीओ सेवेला टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहे. पण YouTubeची सेवा सतत आघाडीवर राहिली आहे.

 यात YouTubeची सेवा अशी अचानक बंद पडल्याने प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. OTT प्लॅटफॉर्मसाठी सध्या YouTubeचं महत्त्व वाढलं आहे. लहान मुलांपासून ते  तरुण ते वृद्धमंडळी मनोरंजन आणि माहिती घेण्यासाठी सतत YouTube चा वापर करत असतात.