इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या कमवा हजारो रुपये

जर तुमच्याकडे कम्प्युटर आणि इंटरनेट आहे तर तुम्हीही घरबसल्या चांगली कमाई करु शकता 

Sunil Desale Sunil Desale | Updated: Nov 9, 2017, 09:57 AM IST
इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या कमवा हजारो रुपये title=
Representative Image

नवी दिल्ली : जर तुमच्याकडे कम्प्युटर आणि इंटरनेट आहे तर तुम्हीही घरबसल्या चांगली कमाई करु शकता. घरबसल्या इंटरनेटच्या माध्यमातून असे काही कामं आहेत जे केल्यास तुम्हाला तासाभरात १००० रुपये कमवता येऊ शकतात.

यासाठी तुम्हाला काही वेळ देण्याची आवश्यकता आहे. आज आम्ही तुम्हाला अशीच काही कामं सांगणार आहोत जे इंटरनेटच्या माध्यमातून केल्यास तुम्ही चांगली कमाई करु शकता.

व्हर्चुअल कॉल सेंटर एजंट:

तुम्ही घरबसल्या कॉल सेंटर एजंटच्या रुपात काम करु शकता.  LiveOps.com तुम्हाला ही संधी उपलब्ध करुन दिली आहे. या साईटवर जाऊन तुम्ही कंपनीचे एजंट बनू शकतात. होम पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही एजंट बनण्यासाठी अप्लाय करु शकता.

  • यासाठी तुम्हाला एक फोन, कम्प्युटर आणि इंटरनेटची आवश्यकता लागणार आहे. 
  • चांगलं इंग्रजी असणं आवश्यक आहे. 
  • पण जर तुमचं इंग्रजी चांगलं नसेल तरीही काळजी करण्याची गरज नाहीये. कारण, कॉल केल्यानंतर तुम्हाला काय बोलायचं आहे हे कंपनीतर्फे तुम्हाला सांगण्यात येणार असतं. 
  • या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही एका तासात ७ ते १५ डॉलरची कमाई करु शकता. 

स्वागबक्स डॉटकॉम (http://www.swagbucks.com): 

स्वागबक्स डॉटकॉम एक प्रसिद्ध वेबसाईट आहे ज्यावर फ्रीमध्ये रजिस्टर केल्यास तुम्ही कमाई सुरु करु शकता. फेसबुकच्या माध्यमातूनही तुम्ही यासोबत जोडले जाऊ शकता. यामध्ये तुम्हाला पैसे कमी मिळतील मात्र, तुमच्या आयुष्यात वापरण्यात येणाऱ्या वस्तू म्हणजेच मोबाईल, हार्ड डिस्क, मग, टी शर्ट इत्यादी वस्तू गिफ्ट मिळतात. या साईटवर तुम्हाला काही वेळ स्पेंड करायचा असतो आणि शॉपिंगपासून सर्चिंग, प्ले, प्रश्न-उत्तर, प्रोडक्टची माहिती मिळवायची आहे. यासाठी वेबसाईट तुम्हाला काही पॉईंट्स देते. हे पॉईंट्स तुम्ही शॉपिंगसाठी वापरु शकता.

ऑनलाईन वर्क: 

ऑनलाईन वर्क उपलब्ध करुन देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पैकी अनेकजण काम करुन घेतात मात्र, पैसे देत नाहीत. अशा व्यक्तींपासून सावध राहून तुम्हाला काम करण्याची संधी एक वेबसाईट उपलब्ध करुन देत आहे. www.odesk.com और www.elance.com सारख्या साईट्स ऑनलाईन कमाईच्या प्रकरणात जगभरातील प्रसिद्ध साईट्समध्ये समाविष्ट आहेत. 

या दोन्ही साईट्सवर सर्वातआधी तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागणार आहे. एकदा रजिस्टर झाल्यानंतर वेगवेगळी कामं करण्यासाठी मेंबर्सला कॉन्ट्रॅक्ट आणि फ्रिलान्सच्या स्वरुपात हायर करतं. काम पूर्ण झाल्यानंतर प्रति तासनुसार पैसे मिळतात. 

सेल्फ पब्लिश बुक: 

जर तुम्हाला लिखाणाची आवड आहे तर अशा अनेक साईट्स आहेत ज्या ऑनलाईन बुक लिहण्याचं काम देऊन त्याचे पैसे देतात. या साईट्सपैकी एक म्हणजे अॅमेझॉन. अॅमेझॉन किंडल डायरेक्ट पब्लिशिंगच्या नावाने सेयह फिचर चालवते. यामध्ये कुणीही ऑनलाईन पुस्तक लिहून ते बुकस्टोरवर अपलोड करु शकतं. अधिक माहितीसाठी  https://kdp.amazon.com/ वर क्लिक करा.

पेड रिव्ह्यू: 

सॉफ्टवेअर किंवा इतर उत्पादनांसाठी रिव्ह्यू लिहिणं. जर तुमच्यात लिहिण्याची क्षमता आहे तर त्याच्या माध्यमातून तुम्ही चांगली कमाई करु शकतात. यासाठी इंफोलिंक हे एक माध्यम उपलब्ध आहे. यामध्ये विंडेल रिचर्स (Vindale Research) आणि एक्सपोटीवी डॉट कॉम (ExpoTv.com) या प्रमुख वेबसाईट्स आहेत.