नवी दिल्ली : चीनची मोबाईल निर्माती कंपनी शाओमीने भारतीय बाजारात आपल्या नोट सीरिजचा विस्तार करत दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.
कंपनीकडून लॉन्च करण्यात आलेल्या शाओमी रेडमी नोट ५(Redmi Note 5) आणि रेडमी नोट ५ प्रो (Redmi Note 5 Pro) ची विक्री भारतात गुरूवारपासून सुरू केली जाणार होती. पण शाओमीची लोकप्रियता पाहता कही मिनिटांमध्येच हे फोन आऊट ऑफ स्टॉक झालेत. ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट आणि मी डॉट कॉम वर काही दिवसात आऊट ऑफ स्टॉक दाखवलं जातंय. कंपनीने गुरूवारी दुपारीच या फोनची विक्री सुरू केली होती.
ही माहिती मिळू शकली नाही की, शाओमीने किती संख्येत हॅंडसेट विक्रीसाठी उपलब्ध केले होते. रेडमी नोट ५ आणि रेडमी नोट ५ प्रो ला कंपनीने दोन-दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केलं होतं. रेडमी नोट ५ गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आलेल्या रेडमी नोट ४ चं अपग्रेड व्हर्जन आहे. फोनमध्ये ५.९९ इंचाची १०८०x२१६० पिक्सल रिझोल्यूशनचा डिस्प्ले दिलाय. हा फोन अॅन्ड्रॉईड नूगावर बेस्ड एमआययूआय ९ वर चालतं.
फोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसर दिला गेलाय. फोनमध्ये १२ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा आहे. तसेच फोनमध्ये ३२ जीबी आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसोबत लॉन्च केले आहेत. पण दोन्हीमध्ये हायब्रिड सिम स्लॉट दिला गेलाय. ३ जेबी रॅमच्या व्हेरिएंटचं ३२ जीबी इंटरनल स्टोरेज आहे.
फोनच्या ४ जीबी रॅम असलेल्या व्हेरिएंटची ६४ जीबी इंटरनल स्टोरेज आहे. रेडमी नोट ५ मध्ये ४००० mAh ची बॅटरी आहे. यात प्रिमियम मेटल बॉडी दिली गेलीये आणि हे फोन रेडमी नोट ४ पेक्षा बरेल स्लिम आहेत.
रेडमी नोट ५ प्रो ला सुद्धा ५.९९ इंचाची १०८०x२१६० पिक्सल रिझोल्यूशन असलेला डिस्प्लेसोबत लॉन्च केलाय. हा फोन क्वॉलकॉम स्नॅड्रॅगन ६३६ प्रोसेसर असलेला जगातला एकमेव स्मार्टफोन आहे. फोनमध्ये लेटेस्ट क्रायो २६० सीपीयू दिला गेलाय. कंपनीचा दावा आहे की, हा रेडमी नोट सीरिजचा सर्वात फास्ट परफॉर्मन्स असलेला फोन आहे. या फोनला ४ जीबी आणि ६ जीबी रॅममध्ये सोबत लॉन्च केलंय. पण दोन्ही व्हेरिएंटमध्ये ६४ जीबी इंटरनल स्टोरेज दिलं गेलंय.
फोनमध्ये रिअर ड्युल १२ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सल कॅमेरा सेटअप आहे. ड्युल फ्रन्ट कॅमेरा २० मेगापिक्सलचा आहे. कंपनीने सांगितलंय की, फोनमध्ये कमी लाईटमध्येही सेल्फी घेतली जाऊ शकते. कॅमेरासोबत एलईडी सेल्फी लाईटही आहे. या फोनमध्ये फेसअनलॉकचं फीचरही आहे. हा फोन ब्लॅक, रोज गोल्द, गोल्द आणि ब्लू रंगांमध्ये उपलब्ध असेल.
भारतीय बाजारात रेडमी नोट ५ ची किंमत ९ हजार ९९९ रूपयांपासून सुरू होते. ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ९ हजार ९९९ रूपये आहे. त्यासोबतच ११ हजार ९९९ रूपयांमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असलेलं व्हेरिएंट मिळेल. रेडमी नोट ५ प्रोची ४ जीबी असलेल्या व्हेरिएंटची किंमत १३ हजार ९९९ रूपये आहे. याच्या ६ जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत १६ हजार ९९९ रूपये इतकी आहे.