Xiaomi ने लॉन्च केला नवा स्मार्टफोन Mi 6X...

 शाओमी (Xiaomi)ने आपला नवा स्मार्टफोन Mi 6X लॉन्च केला.

Updated: Apr 25, 2018, 06:33 PM IST
Xiaomi ने लॉन्च केला नवा स्मार्टफोन Mi 6X... title=

मुंबई : चायनीज मोबाईल निर्माता कंपनी शाओमी (Xiaomi)ने आपला नवा स्मार्टफोन Mi 6X लॉन्च केला आहे. भारतीय बाजारात हा फोन लवकरच  Mi A2 नावाने येईल. याचे अजून एक कारण हे की Mi A1 आता आऊट ऑफ स्टॉक झाला आहे. नवीन फोन अॅनरॉईड 8.1 ओरियोवर चालतो. Xiaomi Mi 6X तीन वेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तीन वेरिएंटमध्ये वेगवेगळी रॅम आणि इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. चीनमध्ये लॉन्च केलेल्या Mi 6X मध्ये 4 GB रॅम आणि  32 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या वेरिएंटची किंमत 1,599 चीनी युआन म्हणजे 16,900 रुपये आहे. दुसऱ्या वेरिएंटमध्ये 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज आहे. या वेरिएंटची किंमत 1,799 चीनी युआन म्हणजे 19,000 रुपये आहे. तर तिसऱ्या वेरिएंटमध्ये 6 GB रॅमसोबत 128 GB इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.

डिस्प्ले

Xiaomi Mi 6X मध्ये 5.99 इंचाची 1080x2160 पिक्सल रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. ड्युल सिम आणि अॅनरॉईड 8.1 ओरियो वर चालणाऱ्या या फोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रेगन 660 प्रोसेसर दिला आहे. याचा लूक Redmi Note 5 Pro सारखा आहे.

कॅमेरा

या फोनमध्ये रिअर आणि फ्रंट दोन्हीही कॅमेरे दमदार आहेत. यात सेल्फी आणि रिअर दोन्ही कॅमेरे 20 मेगापिक्सलचे आहेत. उत्तम फोटोग्रापीसाठी हा एआय इंटिग्रेशनसोबत येतो. मागे असलेला दुसरा कॅमेरा 12 MP चा प्रायमरी सोनी आयएमएक्स 486 सेंसर आहे. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसरसोबत अनलॉक फिचर देखील देण्यात आले आहे.

बॅटरी

शाओमी Mi 6X मध्ये 3010 mAh ची बॅटरी आहे. ही बॅटरी क्विकचार्ज 3.0 ला सपोर्ट करेल. कनेक्टिव्हीटीसाठी यात 4G एलटीई, ड्युल बॅंड वाय फाय, वाय फाय डायरेक्ट, ब्लुटुथ 5.0  देण्यात आले आहे. चायनीज मार्केटमध्ये हा फोन रेड, गोल्ड, रोज गोल्ड, ब्लू आणि ब्लॅक रंगात मिळत आहे.