Interesting: कारखान्याच्या छतावर असलेल्या Turbo Roof Ventilator चं महत्त्व काय? जाणून घ्या

तुम्ही अनेकदा कारखान्यांच्या छतावर गोल गोल फिरणारे घुमटाच्या आकाराची रचना पाहिली असेल. अनेकदा हे नेमकं कशासाठी लावलं आहे? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

Updated: Jul 17, 2022, 12:59 PM IST
Interesting: कारखान्याच्या छतावर असलेल्या Turbo Roof Ventilator चं महत्त्व काय? जाणून घ्या title=

Turbo Ventilator: तुम्ही अनेकदा कारखान्यांच्या छतावर गोल गोल फिरणारे घुमटाच्या आकाराची रचना पाहिली असेल. अनेकदा हे नेमकं कशासाठी लावलं आहे? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.  घुमटाच्या आकाराच्या असलेल्या या वस्तूला 'टर्बो व्हेंटिलेटर' बोललं जातं. या व्यतिरिक्त एअर व्हेंटिलेटर, टर्बाइन व्हेंटिलेटर आणि रुफ एक्सट्रॅक्टर या नावाने देखील ओळखलं जातं. टर्बो व्हेंटिलेटर केवळ कारखान्यांमध्येच नाही तर इतर ठिकाणी देखील वापरले जाते. टर्बो व्हेंटिलेटर स्टेनलेस स्टीलची असते.

गरम हवा बाहेर फेकते

टर्बो व्हेंटिलेटर हवेच्या जोराने गोल गोल फिरते. या टर्बो व्हेटिंलेटरची रचना अशी केली असते की, कारखान्यातील गरम हवा बाहेर फेकली जाईल. गरम हवेबरोबर कारखान्यातील दुर्गंधीही बाहेर फेकते. पावसाळी वातावरणातही टर्बो व्हेंटिलेटरच्या माध्यमातून ओलावा हाताळता येतो.

मशीन कसे चालते?

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हे मशीन चालवण्यासाठी विजेची गरज नाही. यात गरम हवा साचत राहते. ही हवा व्हेंटिलेटरच्या टर्बाइनमध्ये जमा होताच, त्याचप्रमाणे व्हेंटिलेटरमधील पट्टा उलट्या दिशेने फिरतो आणि सर्व गरम हवा कारखान्यातून बाहेर फेकतो.

अशा प्रकारे थंडावा देते

कडक उन्हात हे मशीन दिलासा देण्याचे काम करते. टर्बो व्हेंटिलेटरमध्ये उष्णतेपासून वाचवण्याची क्षमता आहे. कारखान्यातील गरम हवा बाहेर फेकली जात असल्याने आत थंडावा निर्माण होतो.