Knowladge News: चारचाकी वाहनांच्या छतावर का असतो Shark Fin अँटेना, जाणून घ्या यामागचं कारण

शार्क फिन अँटेना एका खास पद्धतीने काम करतो. चला तर मग या शार्क फिन अँटेनाबाबत जाणून घेऊयात. 

Updated: Aug 29, 2022, 01:49 PM IST
Knowladge News: चारचाकी वाहनांच्या छतावर का असतो Shark Fin अँटेना, जाणून घ्या यामागचं कारण title=

How Shark Fin Antenna Do Work: तंत्रज्ञानामुळे ऑटो क्षेत्रात झपाट्याने प्रगती होत आहे. प्रत्येक कंपनी त्याचं अपडेटेड मॉडेल लाँच करत आहेत. प्रत्येक कंपनी कारच्या आत आणि बाहेर नवनवे फिचर्स अपडेट करत आहे. पण अनेकदा गाड्यांमध्ये चांगले फीचर्स देऊनही त्याबद्दलची माहिती नसते. त्यामुळे प्रश्न पडतो, गाड्यांमध्ये असा बदल का करण्यात आला आहे. बहुतांश गाड्यांच्या छतावर शार्क फिन अँटेना लावलेला असतो. अनेकांना असं वाटतं की एखाद्या डिझाईनसाठी असं केलेलं आहे. पण या शार्क फिन अँटेना एका खास पद्धतीने काम करतो. चला तर मग या शार्क फिन अँटेनाबाबत जाणून घेऊयात. 

शार्क फिन अँटेना कसा काम करतं?

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, कारच्या छताच्या भागावर शार्कच्या पंखासारखा भाग असतो. बहुतेक लोक याचा संबंध कारच्या डिझाईनशी जोडतात. मुळात हा एक अँटेना आहे. हा अँटेना तुमच्या कारसाठी सिग्नल म्हणून काम करतो. यामुळे तुमच्या वाहनाला चांगले मोबाइल नेटवर्क मिळते, त्यासोबत रेडिओलाही रेंज मिळते.

शार्कच्या पंखांसारखा आकार का असतो?

अँटेनाला शार्क फिनचा आकार देण्यामागेही एक खास कारण आहे. अँटिना विचित्र दिसू नये म्हणून यासाठी शार्क फिनचे रूप दिले जाते. तसेच हा अँटेना कारमध्ये बसवणे देखील सोपे आहे. अँटेनाची रचना देखील स्लीक आणि एरोडायनॅमिक आहे, ज्यामुळे वाहन वेगात असताना तुटण्याची भीती नसते. अँटिनाचे डिझाईन वर्षानुवर्षे टिकण्यासाठी तयार केलं आहे. त्याचबरोबर IP67 वॉटरप्रूफ देखील आहे.