मुंबई : पुढच्या वर्षीपासून तुमच्या मोबाईलमधील व्हॉट्सएप बंद होऊ शकतं. पण हे कामाचं एप तुम्हाला सुरु ठेवायच असल्यास काही गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतील. व्हॉट्सएप बंद होण्याचे कारण आणि सुरु ठेवण्यासाठी काय करावं लागेल ? हे आपण जाणून घेऊया...
व्हॉट्सएप जुन्या ऑपरेटींग सिस्टिमवर (Operating System)बंद होणार असल्याची माहीती फेसबुकने दिलीय. जुन्या ऑपरेटींग सिस्टमवरील एन्ड्रॉईड ( Android) आणि आयओएस (iOS) वर व्हॉट्सएप सपोर्ट करणार नाही. एन्ड्रॉईडच्या ४.०३ वर्जन आणि आयफोनच्या आयओएस 9 (iOS 9 ) वर्जनच्या सिस्टिमवर सपोर्ट करणार नाही
iPhone 4S, iPhone 5, iPhone 5S, iPhone6 आणि iPhone 6S वापरणाऱ्या युजर्सवर याचा परिणाम होणार आहे. या स्मार्टफोनमधील जुन्या ऑपरेटींग सिस्टिमवर व्हॉट्सएप चालणार नाही.
नव्या निर्णयानंतर ४.०३ वर्जनच्या एंड्रॉईड फोन वापरकर्त्यांवर देखील परिणाम दिसेल. HTC Desire, LG Optimus Black, Motorola Droid Razr, आणि Samsung Galaxy S2 मॉडलवर याचा प्रभाव दिसेल.
तुम्हाला यापासून वाचायचं असल्यास आपल्या फोनची ऑपरेटींग सिस्टिम अपडेट करा असे आवाहन फेसबुकनं केलंय. एंड्रॉईड आणि आयफोन युजर्सला आपल्या फोनमधील ऑपरेटींग सिस्टिम अपग्रेड करावी लागणार आहे.