तुमचा पार्टनर Whatsapp वर कोणाशी चॅट करतो, जाणून घ्या या ट्रिकने

WhatsApp Trick : केवळ चॅटिंगच नाही तर तुम्ही व्हॉट्सअॅपवरही हेरगिरी करू शकता.  व्हॉट्पअॅपमध्ये एक फीचर आहे ज्याबाबत क्वचित कोणाला माहिती असेल. व्हॉट्पअॅपच्या या फीचरद्वारे तुम्ही तुमची जवळची व्यक्ती व्हॉट्पअॅपवर कोणाशी जास्त बोलत आहे हे जाणून घेऊ शकता. 

Updated: Sep 27, 2022, 12:10 PM IST
तुमचा पार्टनर Whatsapp वर कोणाशी चॅट करतो, जाणून घ्या या ट्रिकने   title=

Whatsapp Hidden Features : व्हॉट्सअॅप एक इन्स्टंट मेसेजिंग अॅप्लिकेशन आहे ज्याचा वापर अधिकाधिक केला जात आहे. बहुतेक लोक मित्र आणि कुटुंबाशी संवाद साधण्यासाठी याचा वापर करतात. परंतु व्‍हॉट्सअॅपमध्‍ये अशी अनेक छुपी फिचर्स आहेत. ज्यांची माहिती प्रत्येक युजर्सला नसते. आज आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या अशाच एका छुप्या फीचरबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या पार्टनर, मित्र किंवा खास व्यक्तीवर लक्ष ठेवू शकता. 

ही ट्रिक फॉलो करा : तुमचा पार्टनर किंवा मित्र तुमच्यासोबत फसवणूक करत आहे असे तुम्हाला वाटत असेल. तर तुम्ही ही युक्ती अवलंबू शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहे युक्ती...

- सुरूवातीला तुम्हाला तुमच्या Android फोनमध्ये Unknown Sources ला इनेबल करावे लागेल. याशिवाय Play Protect ला डिजेबल करावे लागेल. त्यानंतर मोबाईल ट्रॅकर अॅप डाउनलोड करा.
- तुम्हाला ज्याचा मोबाईल ट्रॅक करायचा आहे. त्याच्या फोनमध्ये mobile-tracker-free.com/ उघडा.
- ते उघडल्यानंतर, तुमचा ईमेल आयडी टाकून तुमचे खाते तयार करा.
- खाते तयार केल्यानंतर तुमच्या ईमेल आईडीवर एक वेरिफिकेशन लिंकचा मेल येईल. त्या लिंकवर क्लिककरून खाते वेरिफाई करा. 
-आता तुम्हाला लॉगिन करावे लागेल. याच्या पुढे एक पॉप-अप मेसेज येईल ज्यामध्ये तुम्हाला I Understood वर क्लिक करावे लागेल. हे अॅपल्किेशन विनामूल्य आहे. 
- त्यानंतर खाली दिलेल्या Download Application वर क्लिक करा.
- हे एपीके अॅप असल्याने तुम्हाला डाउनलोडवर जाऊन ते कॉन्फिगर करावे लागेल.
- प्रत्येक प्रक्रिया पूर्ण होताच अॅप डाउनलोड केले जाईल. आता तुम्ही अॅप चालू करताच तुम्हाला ते वापरण्याचे कारण विचारले जाईल. येथे - तुम्हाला My Child, My Collague आणि My Own Device चा पर्याय मिळेल. तुम्हाला कोणताही एक पर्याय निवडावा लागेल.
- यानंतर, सर्व नियम आणि शर्तींना परवानगी द्या. येथे लक्षात ठेवा की या अॅपचे नाव WiFi असे दिसेल.
- आता तुम्हाला हे अॅप अनइंस्टॉल करण्यास सांगितले जाईल. ओके क्लिक करून तुम्ही ते अनइंस्टॉल करू शकता. 
- कारण हे अॅप्लिकेशन जोडीदाराच्या फोनवरून निघून गेला आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला संशय येणार नाही. 
- आता हे अॅप तुम्हाला तुमच्या फोनवर डाउनलोड करावे लागेल. येथेही नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया तशीच राहील.
- आता तुम्ही तुमच्या पार्टनरशी संबंधित सर्व माहिती पाहू शकाल,.जसे की तो WhatsApp वर किती वेळा ऑनलाइन आला ते फोनमध्ये कोणते अॅप उघडले या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.