व्हॉट्सअॅपने नवे फिचर, अॅडमिनला सर्वाधिकार

सोशल मीडियात अव्वल असणाऱ्या व्हॉट्सअॅपने नवे फिचर आणलेय.

Updated: Jun 30, 2018, 08:24 PM IST
व्हॉट्सअॅपने नवे फिचर, अॅडमिनला सर्वाधिकार title=

मुंबई : सोशल मीडियात अव्वल असणाऱ्या व्हॉट्सअॅपने नवे फिचर आणलेय. यामुळे ग्रुप अॅडमिनला सर्वाधिकार मिळणार आहेत. यामुळे कोणी कोणती पोस्ट टाकली तरी ती पोस्ट प्रसिद्ध करायची की नाही, याचा अधिकार हा अॅडमिनला असणार आहे. त्यामुळे अॅडमिनची ताकद वाढली आहे. ग्रुप सेटिंगमध्ये  सेंड मेसेजेस हा नवा पर्याय देण्यात आला आहे.

 एखादी पोस्ट व्हाट्सअॅपला पडली की ती लगेच व्हायरल होते. त्याला तसा प्रतिसादही मिळतो. मात्र, काहीवेळा अफवाही पसरविल्या जातात. त्यामुळे समाजात तणाव निर्माण होतो. त्यामुळे अशा तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट प्रसिद्ध करायच्या की नाही, याचा अधिकार हा अॅडमिनला असणार आहे. त्यामुळे अशा पोस्टना आळा बसणार आहे.

नव्या फिचरमुळे अॅडमिनला दोन पर्याय मिळतात पहिला असतो तो म्हणजे ग्रुपमधील कोणत्याही सदस्याने पोस्ट टाकण्याची मुभा असलेला पर्याय आणि दुसरा म्हणजे फक्त अॅडमिननेच पोस्ट टाकण्याचा पर्याय

असे फिचर वापरा

- ज्या ग्रुपसाठी निर्णय घ्यायचा आहे, तो ग्रुप निवडा
- ग्रुपचे जिथे नाव असते त्याच्या बाजूला तीन टिंब असतात त्यावर क्लिक करा.
- यातील सगळ्यात पहिला म्हणजे ‘Group info’हा पर्याय निवडा
- हा पर्याय निवडताच तुम्हाला पाच पर्याय आलेले दिसतील
यातील तुम्हाला ‘Group Setting’ हा पर्याय निवडायचा आहे.
- त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिला पर्याय दिसेल तो असेल ‘Edit group info’
- यामध्ये आता तुम्हाला All participant किंवा Only admin यापैकी हवा तो पर्याय निवडायचा आहे.

अॅडमिनने नवे फिचर वापरुन इतर सदस्यांना पोस्ट करण्यास बंदी घातली असेल आणि एखाद्याने पोस्ट टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याबाबतचा मेसेज अॅडमिनला मिळतो.