Hybrid vs Normal Cars: ऑटो क्षेत्रात गेल्या काही महिन्यात बरेच बदल घडत आहेत. पेट्रोल डिझेलनंतर आता बहुतांश सर्वच कंपन्या इलेक्ट्रिक कार निर्मिती क्षेत्रात उतरल्या आहेत. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती पाहता ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक गाड्या खरेदीकडे आहे. भारतात इलेक्ट्रिक गाड्यांसबोत हायब्रिड गाड्यांचीही जोरदार चर्चा रंगली आहे. मारुति सुझुकीने ग्रँड विटारा (Maruti Grand Vitara) आणि टोयोटोने अर्बन क्रुझर हायरायडर (Toyota Urban Cruiser Hyryder) एसयूव्ही सादर केली आहे. दोन्ही गाड्या हायब्रिड तंत्रज्ञानावर आधारित असून सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या एसयूव्ही आहेत. ही अतिशय उच्च तंत्रज्ञानाची वाहने आहेत. या गाड्या कमी प्रदूषण पसरवतात आणि सध्याची सर्व तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. या गाड्यांमुळे इंधनाची बचत होते कारण इंधनाचा वापर इलेक्ट्रिक मोटरच्या वापरापेक्षा कमी असतो. पण अनेकांना हायब्रिड तंत्रज्ञान नेमकं काय आहे? याबाबत माहिती नसते.
हायब्रिड कारमध्ये पेट्रोल इंजिनसह एक अतिरिक्त इलेक्ट्रिक मोटार असते. यामुळे इंधनाची बचत होते आणि गाडी चांगला मायलेज देते. या गाडीची बॅटरी चार्ज करण्याची गरज भासत नाही. ही बॅटरी आवश्यकतेनुसार चार्ज होते. त्यामुळे गाडी चांगला मायलेज देते.
अरे देवा हे काय केलंस! Scorpio-N चा लूक आनंद महिंद्र आश्चर्यचकीत, ट्वीट करत म्हणाले...
हायब्रिड कारमध्ये पेट्रोल आणि इलेक्ट्रिक मोटार असते. गाडी सुरु केल्यानंतर गाडी शक्य तितकं बॅटरीचा वापर करते. पण जेव्हा बॅटरी डाऊन होऊ लागते तेव्हा पेट्रोल इंजिनवर शिफ्ट होते. या दरम्यात पेट्रोल इंजिन बॅटरी चार्ज करते. या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे बॅटरीवरून पेट्रोल आणि पेट्रोलवरून बॅटरीवर गाडी सहज शिफ्ट होते. या प्रोसेसमध्ये जराही जर्क बसत नाही.
हायब्रीड कारमध्ये वापरल्या जाणार्या बॅटरीचे आयुष्य कमी असतं. दुसरे साध्या मेकॅनिककडून गाडी सर्व्हिस करता येत नाही. या वाहनांची दुरुस्ती केवळ कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्येच होऊ शकते. भारतामध्ये बॅटरीची विल्हेवाट लावण्यासाठी किंवा रीसायकल करण्याचा कोणताही योग्य मार्ग नाही. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते.