इटलीमध्ये एकावेळी सर्वात जास्त रोबो डान्सची नोंद

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये इटलीमध्ये एकाचवेळी १ हजार ३७२ ह्य़ुमनॉइड रोबोंनी केलेल्या डान्सची नोंद झाली.

Jaywant Patil Updated: Apr 3, 2018, 09:11 PM IST
इटलीमध्ये एकावेळी सर्वात जास्त रोबो डान्सची नोंद title=

रोम : गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये इटलीमध्ये एकाचवेळी १ हजार ३७२ ह्य़ुमनॉइड रोबोंनी केलेल्या डान्सची नोंद झाली. या डान्सनंतर चीनमधील विक्रम मोडला गेला आहे.  डान्स करणाऱ्या रोबोटची निर्मिती २०१६ पासून तंत्रज्ञान कंपन्या करतात. यात जास्तीत जास्त रोबोंनी एकाचवेळी डान्स करण्याचा रेकॉर्ड बनवण्याचा देखील उद्देश असतो.

रोबोटनी एकाचवेळी केलेल्या नृत्याची नोंद मागील वर्षी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये झाली होती. चीनमध्ये गतवर्षी ऑगस्टमध्ये १ हजार ०६९ डोबी म्हणजेच रोबोट नाचले.

आताचा हा विक्रम इटलीत आहे. अल्फा १ एस रोबोंनी सामूहिक नृत्य केले. हे रोबो ४० सें.मी उंचीचे आहेत आणि ते अ‍ॅल्युमिनियमच्या संमिश्रापासून प्लास्टिक आवरणाने तयार केले आहेत. ह्य़ूमनॉइड रोबो चीनच्या उबटेक कंपनीने तयार केले असून याच रोबोंनी २०१६ मध्ये पहिला विक्रम केला होता.

गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डसचे लोरेन्झो वेल्ट्री यांनी या कार्यक्रमात निरीक्षक म्हणून काम केले. सर्व ह्य़ुमनॉइड रोबोच सारख्या वेळात न चुकता नृत्य करीत आहेत, याची खातरजमा करण्यात आली. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने म्हटले आहे, यातील अल्फा १ एस रोबो हे लवचिक असून ते नृत्यातील वेगवेगळ्या लयी संगीतानुसार बदलू शकतात.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x