वोडाफोनच्या यादीत आहात का? मग तुम्हालाही मिळेल 4GB 4जी डेटा फ्री

आजवर अनेक टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना धमाकेदार ऑफरखाली इंटरनेट डेटा फ्री दिला आहे. यात वोडाफोनचाही समावेश होता. आता मात्र, या वोडाफोनने जरा हटकेच ऑफर लॉंच केली आहे. ही ऑफर त्यांनाच मिळू शकते जे वोडाफोनसाठी काहीसे खास असतील.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 23, 2017, 04:57 PM IST
वोडाफोनच्या यादीत आहात का? मग तुम्हालाही मिळेल 4GB 4जी डेटा फ्री title=

नवी दिल्ली : आजवर अनेक टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना धमाकेदार ऑफरखाली इंटरनेट डेटा फ्री दिला आहे. यात वोडाफोनचाही समावेश होता. आता मात्र, या वोडाफोनने जरा हटकेच ऑफर लॉंच केली आहे. ही ऑफर त्यांनाच मिळू शकते जे वोडाफोनसाठी काहीसे खास असतील.

वोडाफोनने लॉंच केलेल्या नव्या ऑफरनुसार, ज्या वोडाफोन ग्राहकांजवळ 4जी सीम आहे पण, ते 3जी सेवा वापरत आहेत. या वोडाफोन ग्राहकांना कंपनी सातत्याने मेसेज पाठवत आहे की, तुम्ही 4जी सेवा तत्काळ सुरू करा. अन्यथा, तुमचे सिमकार्ड रिजेक्ट होऊ शकेल. यूजर्सने जर आपले 3जी सिम 4जी मध्ये अपग्रेड केले तर, वोडाफोन त्या ग्राहकास 4GB 4जी डेटा देत आहे. तो सुद्धा टोटली फ्री. महत्त्वाचे असे की, जे ग्राहक सुरूवातीपासूनच 4जी सिम वापरत आहेत, अशा ग्राहकांसाठी ही ऑफर लागू नाही.

तुम्हाला जर तुमचे सिम अपग्रेड करायचे असले तर, कोणत्याही वोडाफोन स्टोअर किंवा रिटेलरकडे ही सुविधा उपलब्ध आहे. सिम अपग्रेड करण्यासाठी १० रूपये इतके शुल्क आकारले जाईल. सिम अपग्रेड केल्यावर मिळणाऱ्या 4GB 4जी डेटासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या 4GB 4जी डेटाची वैधता केवळ १० दिवस इतकी असेन.

ही ऑफर घेतल्यावर कंपनीकडून सिम अपग्रेड करण्याची प्रोसेस सुरू होईल. कंपनीकडून तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल की, तुम्ही जर ही प्रोसेस रद्द करू इच्छित असाल तर, CAN लिहून ५५१९९ वर रिप्लाय करा. आता सिम अपग्रेड करण्याची प्रोसेस पूर्ण झाली आहे, असा मेसेज येईल. त्यानंतर तुमच्या अगोदरच्या सिमचे नेटवर्क आपोआप रद्द होईल. मग फोन स्विच ऑफ करून ऑन करा. तुमच्या फोनवर नवी 4जी सेवा सुरू झालेली असेन. पण, तुमच्या फोनवरून गोदरची 3जी सेवा पूर्णपणे निघून जात नाही, तो पर्यंत 4जी सेवा तुमच्या फोनवर सुरू होणार नाही.