Vivo T3x 5G Specifications: Vivoने भारतात आणखी नवीन एक स्मार्टफोन लाँच केेल आहेत. Vivo T3x 5G हा स्मार्टफोन कंपनीने लाँच केला आहे. T सीरीजच्या या फोनमध्ये 120 HZ रिफ्रेश रेट सोबतच फुल एचडी डिस्प्ले मिळणार आहे. त्याचबरोबर 6,000 mAh क्षमतेची बँटरी असणार आहे. 44W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला असून वीवोच्या या नव्या फोनची विक्री पुढच्या आठवड्यापासून होणार आहे. या फोनची खासियत आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊया.
Vivo T3x 5G के 4GB + 128GB व्हेरियंटची किंमत 13,499 रुपये इतके आहे. तर 6GB + 128GB व्हेरियंटची किंमत 14,999 रुपये आणि 8GB + 128GB व्हेरियंटची किंमत 16,499 रुपये इतकी असणार आहे. दोन रंगांमध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. 24 एप्रिलपासून याची विक्री सुरू होणार आहे. ग्राहक हा फोन विवो ऑफिशियल ऑनलाइन स्टोअर, फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवरुनही खरेदी करु शकणार आहेत. ग्राहकांना HDFC बँक आणि SBI कार्डवर 1,500 रुपयांपर्यंत डिस्काउंटदेखील मिळणार आहे.
ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्ट असलेला हा स्मार्टफोनमध्ये Android 14 Funtouch OS 14 वर रन होतो. त्याचबरोबर, 1000 nits पीक ब्राइटनेस आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.72-इंच पुल-एचडी (1,080×2,408 पिक्सेल) LCD डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये 8GB LPDDR4X रॅम आणि 128GB UFS 2.2 स्टोरेजसह Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसर आहे. त्याची इनबिल्ट रॅम 8GB पर्यंत वाढवता येऊ शकते. त्याच वेळी, कार्डच्या मदतीने त्याची अंतर्गत मेमरी 1TB पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी हा फोन सगळ्यात बेस्ट आहे. स्मार्टफोनमध्ये रिअर 50 MP प्रायमरी कॅमेरा आणि 2 MP सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला 8 MP कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठीही या फोनचा पर्याय खूप चांगला ठरु शकतो. स्मार्टफोनमध्ये 5G, Wi-Fi, Bluetooth 5.1, GPS, OTG, Beidu, Glonass आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. सिक्युरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर बाजूला बसवले आहे. यामध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर देखील देण्यात आले आहेत. Vivo T3x 5G ची बॅटरी 6,000mAh आहे आणि 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील येथे दिला गेला आहे.