...तर बंद होईल तुमचे ट्विटर अकाऊंट

सोशल मीडिया सध्या आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनलाय. काहींसाठी सोशल मीडिया टाईमपासचे साधन आहे तर काहींसाठी महत्तवाचे. अनेकजण तर सोशल मीडियावर बिझनेसही करु लागलेत. सोशल मीडिया उत्पन्नाचे साधन बनलेय. 

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Nov 28, 2017, 05:00 PM IST
...तर बंद होईल तुमचे ट्विटर अकाऊंट title=

नवी दिल्ली : सोशल मीडिया सध्या आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनलाय. काहींसाठी सोशल मीडिया टाईमपासचे साधन आहे तर काहींसाठी महत्तवाचे. अनेकजण तर सोशल मीडियावर बिझनेसही करु लागलेत. सोशल मीडिया उत्पन्नाचे साधन बनलेय. 

त्यासोबतच एखाद्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जातो. अनेकदा काही गोष्टी सोशल मीडियावर ट्रोल होतात. सोशल मीडियावर व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य असले तरी काहीजण याचा गैरवापर करतात. ट्रोल करताना अनेकदा आक्षेपार्ह शब्दही वापरले जातात. 

यातच आता ट्विटर लवकरच यावर काही प्रमाणात आळा घालण्यासाठी नवा नियम घेऊन येतोय. १८ डिसेंबरपासून ट्विटरवर नव्या नियमांचा समावेश केला जाणार आहे. 

असे करण्याचा प्रयत्न केल्यास अकाऊंट होणार बंद

ट्विटरवर आक्षेपार्ह विधान अथावा ट्रोल करण्याचा प्रयत्न झाल्यास अकाऊंट बंद होणार. अनेकदा एखाद्यावर टीका करताना सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधाने वापरली जातात. ट्विटरच्या हेटफ़ुल कंडक्ट पॉलिसीनुसार, १८ डिसेंबरपासून ट्विटरवर एखाद्याने ट्रोल करण्याचा वा आक्षेपार्ह विधाने वापरण्याचा प्रयत्न केल्यास ट्विटर अकाऊंट बंद केले जाईल. 

बंद होण्याआधी दिला जाणार इशारा

एखाद्या व्यक्तीचे ट्विटर अकाऊंट बंद करायचे असल्यास ट्विटर सर्वात आधी युझरला ट्वीट डिलीट करण्याचा इशारा देईल. मात्र त्यानंतरही यूझरने ते ट्विट डिलीट केले नाही तर ट्विटरकडून ते अकाऊंट डिलीट होईल.