ट्विटरची १४० अक्षरांची मर्यादा आता दुपटीने वाढवली

जगभरात माईक्रो ब्लॉगिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या ट्विटर यूझर्ससाठी आनंदाची बातमी आहे. ट्विटर यूजर्ससाठी अक्षरांची मर्यादा ट्विटरनं दुप्पटीनं वाढवली आहे.

Updated: Nov 8, 2017, 08:29 AM IST
ट्विटरची १४० अक्षरांची मर्यादा आता दुपटीने वाढवली  title=

मुंबई : जगभरात माईक्रो ब्लॉगिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या ट्विटर यूझर्ससाठी आनंदाची बातमी आहे. ट्विटर यूजर्ससाठी अक्षरांची मर्यादा ट्विटरनं दुप्पटीनं वाढवली आहे.

म्हणजे तुम्ही आता अधिक मोठा मेसेज त्यावर शेअर करू शकाल. ट्विटरने आता १४० अक्षरांची मर्यादा आता २८० अक्षरांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे यूजर्स आता आपले विचार अधिक प्रभावीपणे आणि सविस्तर मांडू शकणार आहेत. अनेकांना अक्षरांच्या मर्यादेमुळे आपले म्हणने अर्धवटच सांगावे लागत होते.

काही मोजक्या यूझर्ससाठी प्रायोगिक तत्वावर ही २८० अक्षरांची मर्यादा सप्टेंबरमध्येच लागू करण्यात आली होती. तो प्रयोग यशस्वी झाल्यानं आता जगभरातल्या भाषांसाठी हा नियम लागू करण्यात येत असल्याचं ट्विटरच्या व्यवस्थापनानं भारतीय वेळनुसार रात्री दोन वाजता स्वतःच्या ट्विटर हँडलवर जाहीर केलंय.

ट्विटरनं केलेल्या सर्वेक्षणात युरोपियन भाषांमध्ये म्हणणं मांडणा-यांना १४० अक्षरांची मर्यादा सर्वाधिक अडचणीची ठरत होती...तर आशिया भाषा वापरणा-यांना मात्र १४० अक्षरात विचार मांडणं सोपं जात होतं. पण सार्वत्रिक विचार करता अक्षर मर्यादा वाढवण्यात येत असल्याचं ट्विटरनं आपल्या अधिकृत ब्लॉगवर स्पष्ट केलंय.