ट्विटरनं बंद केली ती ४५ अकाऊंट्स

ट्विटरनं ब्रेक्सिट, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांचा दुष्प्रचार करणारी ४५ संशयास्पद ट्विटर अकाऊंट्स बंद केली आहेत. 

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Nov 25, 2017, 10:46 PM IST
ट्विटरनं बंद केली ती ४५ अकाऊंट्स  title=

सॅन फ्रान्सिस्को : ट्विटरनं ब्रेक्सिट, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल यांचा दुष्प्रचार करणारी ४५ संशयास्पद ट्विटर अकाऊंट्स बंद केली आहेत. ट्विटरला रशियाशी संबंध असलेल्या अकाऊंट्सच्या नेटवर्कबाबत माहिती मिळाली होती, त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं. या ४५ संशयास्पद ट्विटर अकाऊंटबाबत माहिती गोळा केल्यानंतर कारवाई करण्यात आली.

हे आहे ट्विटर अकाऊंट बंद करण्याचं कारण

डेटा वैज्ञानिकांना ट्विटरवर १,५६.२५२ रशियन अकाऊंट्स मिळाली. या अकाऊंट्सनी युक्रेन संघर्षापासून ते ब्रेक्सिटपर्यंतच्या विषयाबाबत ट्विट्स केली होती. या अकाऊंट्सनी १३ जूनच्या एक दिवस आधी जवळपास १ हजारांहून अधिक पोस्ट करण्यात आल्या होत्या. यातले अनेक जण पुतिन यांचे समर्थक होते. या अकाऊंटवरून २३ ते २४ जूनदरम्यान ३९ हजार पोस्ट करण्यात आल्या होत्या. अमेरिकेत झालेल्या निवडणुकीवेळी या खात्यांचा वापर झाल्याची माहिती समोर आली आहे.