Phone Number वरून माहित करा Live Location! करा हे ' सिम्पल' काम

How To Track Live Location: आज आम्ही तुम्हाला अशाच एका भन्नाट अँप बद्दल सांगणार आहो, ज्याच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाइन मोबाइल नंबरची लोकेशन कसे हे माहीत करून घेऊ शकाल.  

Updated: Sep 29, 2022, 01:47 PM IST
Phone Number वरून माहित करा  Live Location! करा हे ' सिम्पल' काम  title=

Live Location Tracking: एखाद्या व्यक्तीचापत्ता जर केवळ मोबाईल नंबर वरून माहिती झाला असता तर छानच झाले असते. म्हणजे संकटकाळी त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे सोपे झाले असते. त्या व्यक्तीला आवश्यक ती मदत देखील वेळेवर करता अली असती. आज आम्ही तुम्हाला अशाच एका भन्नाट अँप बद्दल सांगणार आहो, ज्याच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाइन मोबाइल नंबरची लोकेशन कसे हे माहीत करून घेऊ शकाल. ()

अनेक वेळा असे घडते की आपला मित्र किंवा नातेवाईक कुठे आहे हे जाणून घ्यायचे असते. तेव्हाच  नेमकं सबंधित व्यक्तीबरोबर संपर्क होत नाही, त्यावेळी आपण आणखी टेन्शनमध्ये येतो. अशा वेळी लोकेशन ट्रॅकिंगचे (Location Track) नाव समोर येते. त्यावेळी आपण स्मार्टफोन किंवा मोबाइल नंबरद्वारे ट्रॅक करण्याचा प्रयत्न करत असतो.

पण काहीवेळेस अर्धवट माहितीमुळे ट्रक करताना अनेक अडचणी येतात. पण आम्ह एक भन्नाट अँप बद्दल सांगणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाइन मोबाइल नंबरची लोकेशन कसे हे माहीत करून घेऊ शकाल.  

Location Tracking ची सोपी पध्दत

लोकेशन ट्रॅकींग ही टेलिकॉम कंपन्यांशी संबंधित आहे. पोलिस आणि सरकारी यंत्रणा कोणाचेही लोकेशन ट्रेस करण्यासाठी ही पद्धत वापरतात. यामध्ये टेलिकॉम कंपनीची मदतीने  सबंधित व्यक्तीचे लोकेशन ट्रेस करणं शक्य असतं.  न्यायालयाच्या आदेशानुसार ही कंपनी युजर्सचा तपशील ट्रॅक करून पोलिसांना देते. ही पद्धत सर्वसामान्यांना वापरता येत नाही.

याप्रमाणे शोधू शकता

आता आम्ही तुम्हाला त्या ट्रिकबद्दल सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही स्वतः पोलिस किंवा टेलिकॉम कंपन्यांच्या मदतीशिवाय तुमच्या ओळखीचे लोकेशन कुठे आहे ते जाणून घेऊ शकता... यासाठी तुम्हाला Truecaller अॅपचा वापर करावा लागेल. यामध्ये तुम्हाला सर्च बारमध्ये फक्त तो नंबर टाकावा लागेल ज्याचे लोकेशन तुम्हाला शोधायचे आहे.

यानंतर तुम्हाला इग्जैक्ट लोकेशन (Exact location) समजणार नाही पण कोणत्या जिल्ह्यातून आहे हे नक्की कळेल. तसेच तुम्हाला त्या व्यक्तीच्या ऑपरेटरचा पत्ता देखील मिळू शकेल आणि जर नाव माहित नसेल तर तुम्हाला त्याचे नाव देखील कळू शकेल.

वाचा : हृदय निरोगी ठेवूया, खिशाला परवडणारे स्वस्त आणि मस्त उपाय करूया

असं देखील लोकेशन ट्रॅक करता येईल

WhatsApp वरून ही तुम्हाला समोरच्या व्यक्तीचे लोकेशन समजू शकेल.  जर कोणी तुमच्यासोबत लाइव्ह लोकेशन किंवा सध्याचे लोकेशन शेअर करत असेल तर तुम्ही त्यांचे लोकेशन आणि हालचाल सहजपणे ट्रॅक करू शकता. थर्ड पार्टी अॅप्स लोकेशन ट्रॅकिंगसाठी वापरू नयेत कारण हे अॅप तुमचा महत्त्वाचा डेटा चोरू शकतात आणि ते सुरक्षित नाहीत.