Toyota Innova HyCross Launch in india: टोयोटा लवकरच भारतासह इंडोनेशियात आपली नवीकोरी एमपीव्ही इनोव्हा हायक्रॉस (Toyota Innova HyCross) लाँच करणार आहे. टोयोटा इंडोनेशियाने या एमपीव्ही गाडीचा टीझर लाँच केला आहे. ही गाडी इंडोनेशियात 21 नोव्हेंबरला लाँच केली जाणार आहे. गाडीची लांभी 4.7 मीटर आणि व्हिलबेस 2,850 मीमी असणार आहे. या गाडीचे हायब्रीड कॅरेक्टर, फ्रंट स्टाइल आणि डिझाइन समोर आलं आहे. टोयोटा इनोव्हा हायक्रॉसमध्ये मोठं सनरूफ असेल असं टीझरवरून दिसते. इनोव्हामध्ये पहिल्यांदाच फॅक्टरी फिट सनरूफ असेल. गाडीवरील रूफ-माउंट केलेले एअर-व्हेंट्स आणि एम्बियंट लायटिंग देखील दिसून येत आहे. मागच्या सीटवरील प्रवाशांसाठी फ्रंट-सीट माउंटेड रिअर मॉनिटर्ससह दिला जाईल.
इतकंच नाही तर नव्या इनोव्हामध्ये आणखी जबरदस्त फीचर्स असणार आहेत. या गाडीत सेफ्टी सेंसर असणार आहे. यामुळे प्री कोलिशन सिस्टम, डायनामिक रडार क्रूझ कंट्रोल, लेन ट्रेसिंग असिस्ट आणि ऑटोमॅटिक हाय बीम सारखे फीचर्स दिले आहेत. नव्या मॉडेलमध्ये टेलगेट, एलईडी हेडलँप आणि स्टॉप लँप, अंडर फ्लोअर स्टोरेज, ओटोमन फंक्शनसह कॅप्टन सीट, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक आणि 360 डिग्री कॅमेरा दिला आहे.
The new energy that comes with better power is on the way to energize you! #ToyotaIndonesia pic.twitter.com/lGExvdg6KM
— Toyota Indonesia (@ToyotaID) November 2, 2022
या गाडीमध्ये 2.0 लीटर हायब्रिड पॉवरट्रेन असणार आहे. इंजिनच्या आउटपुटबद्दलची माहिती अजूनही समोर आलेली नाही. गाडी किती मायलेज आणि किती टॉर्क जनरेट करते, याबाबत माहिती नाही. या गाडीची किंमत 35 ते 40 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.