चीनच्या Tiktok ऍपने प्रोफाईलवर लावला तिरंगा, भारतीय भडकले

युझर्सने कमेंट करून व्यक्त केला राग 

Updated: Jun 28, 2020, 03:35 PM IST
चीनच्या Tiktok ऍपने प्रोफाईलवर लावला तिरंगा, भारतीय भडकले  title=

मुंबई : चीनच्या लोकप्रिय शॉर्ट व्हिडिओ मेकिंग टिकटॉक (Tiktok)ने आपल्या सोशल मीडियाच्या प्रोफाइलवर (Profile Photo) भारताचा झेंडा लावला. या अगोदर फेसबुक किंवा ट्विटरवर फक्त प्रोफाइल फोटोत टिकटॉकचा लोगो दिसत होता. पण आता काही दिवसांपासून लोगोच्या उजव्या बाजूला खाली भारताचा झेंडा दिसत आहे. 

एका बाजूला भारत आणि चीन यांच्या तणावाच वातावरण आहे. तर भारतीय सोशल मीडियावर चीनचं सामान आणि चीनचे ऍप बायकॉट करण्याची मागणी केली जात आहे. अशातच टिकटॉकच्या प्रोफाइलमध्ये तिरंग्याचा समावेश केला आहे. भारताचा तिरंगा हा भारतीय ग्राहकांची नाराजी पाहता लावल्याचं म्हटलं जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, टिकटॉकला अगदी सुरूवातीपासूनच विरोध दर्शविला जात होता. अशा परिस्थितीत प्रोफाइल फोटोमध्ये तिरंगा झळकवणं हा भारतीय ग्राहकांशी जोडले गेल्याचं प्रतिक म्हणून लावण्यात आलं आहे. टिकटॉकचे ऑफिशिअल फेसबुक पेजवर १.५ करोडहून अधिक फॉलोअर्स आहेत. 

ऍपचा प्रोफाइल फोटो शनिवारी संध्याकाळी बदलण्यात आला. यानंतर त्यांच्या प्रोफाइल फोटोवर भारतीय झेंडा लावण्यात आला. यावर भारतीय झेंडा लावल्यामुळे युझर्स नाराज झाले आहेत. प्रोफाइल फोटोवर अनेकांनी RIP असं कमेंट करून स्पॅम केलं. रिऍक्शन देत युझर्स फनी आणि अँग्री इमेज कमेंट करत आहेत.