अनोखा डबल स्क्रीन फोन; LG चे 5G स्मार्टफोन चा फर्स्ट लूक

एलजी इलेक्ट्रॉनिक्स (LG Electronics) ने सोमवारी आपल्या दुसऱ्या 5G ची झलक दाखवत एक व्हीडीओ जारी केला आहे, ज्यात वेगवेगळ्या करता येतील अशा, दोन स्क्रीन आहेत.

Updated: Aug 19, 2019, 04:05 PM IST
अनोखा डबल स्क्रीन फोन;  LG चे 5G स्मार्टफोन चा फर्स्ट लूक title=

सियोल : एलजी इलेक्ट्रॉनिक्स (LG Electronics) ने सोमवारी आपल्या दुसऱ्या 5G ची झलक दाखवत एक व्हीडीओ जारी केला आहे, ज्यात वेगवेगळ्या करता येतील अशा, दोन स्क्रीन आहेत, हा डबल स्क्रीनचा फोन पुढच्या महिन्यात लॉन्च करण्यात येईल. LG ने या स्मार्टफोनला थिनक्यू वी ५० ला लॉन्च करण्याच्या ४ महिन्यानंतर ६ सप्टेंबरला बर्लिनमध्ये आईएफएमध्ये लॉन्च करण्याची योजना केली आहे. IFA 2019 युरोपचा सगळ्यात मोठा टेक शो आहे.

न्यूज एजंन्सी योनहाप न्यूजच्या रिपोर्टमध्ये सांगितले की, कंपनीने १५ सेकंदाचा व्हीडीओ जारी केला आहे, ज्याचे शीर्षक 'ड्युअल द बेटर' आहे. यात दोन स्क्रीनचा स्मार्टफोन दाखवला आहे. 

कोरीयाई स्मार्टफोन निर्माता म्हणाले की, नवीन फोनमध्ये फ्री स्टॉप हिंग टेक्नॉलॉजीचा प्रयोग केला आहे, जो सेकेंड स्क्रीनला कोणत्या ही स्थितीत ठेवण्यात किंवा लॅपटॉप सारखा फोल्ड होण्यास सक्षम आहे.

शक्यता अशी देखील आहे की, नवीन 5G फोनचे नाव V60 असेल, ज्याची सॅमसंगच्या गॅलेक्सी नोटशी मोठी स्पर्धा होण्याची शक्यता आहे. सॅमसंगचा  Galaxy Note 10 ऑगस्टमध्ये लॉन्च झाला आणि Galaxy Fold सप्टेंबरमध्ये लॉन्च केला जाईल.