Malicious apps list : गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) अनेक असे अॅप्स असतात, जे युझर्स विनाकारण मोबाईलमध्ये इनस्टॉल करून ठेवतात. त्यामुळे सायबर गुन्हेगार याकडे एक संधी म्हणून पाहतात. गुगल प्ले स्टोअरवर असे अनेक अॅप्स आहेत ज्यांच्या इन्स्टॉलेशनमुळे फोनमध्ये मालवेअर येण्याची शक्यता वाढते आणि कधीकधी त्यांच्यामुळे संवेदनशील माहिती लीक होण्याचा धोका असतो. अशातच आता एका रिपोर्टनुसार धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमध्ये अशा 12 धोकादायक अॅप्सची माहिती देण्यात आली आहे. असे काही अॅप्स 2021 ते 10 सप्टेंबर 2023 पर्यंत गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होते, ज्यामुळे वापरकर्त्यांचा डाटा लीक होत होता. आम्ही तुम्हाला अशाच काही ॲप्सबद्दल सांगणार आहोत जे अॅप्स इन्स्टॉल करून ठेवलं असल्यास तुम्हाला लगेच डिलीट करावं लागेल.
आत्ताच डिलीट करा अॅप
रफाकत, प्रिवी टॉक, MeetMe, लेट्स चॅट, क्विक चॅट, चिट चॅट, हेलो चॅट, योहूटॉक, टिकटॉक, निडस, ग्लोचॅट, वेव चॅट, यापैकी जर तुम्ही तुमच्या फोनमध्ये खालीलपैकी कोणतंही अॅप इन्स्टॉल केलं असेल तर तुम्ही तात्काळ डिलीट करा.
अशी चूक करू नका
युझर्सने त्यांना माहित नसलेल्या लोकांनी शिफारस केलेलं अस्पष्ट चॅट अॅप्स डाउनलोड करणं टाळावं. कोणत्याही वेबसाइटवरून अॅप डाउनलोड करणं टाळावं. अधिकृत साइट किंवा प्ले स्टोअरवरून कोणतेही अॅप डाउनलोड करा.
मुंबई सायबर क्राईम नगरी
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई महानगरी गुन्ह्यांचीही राजधानी बनली आहे. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मुंबईत वाढले असून, २०१८ ते २०२२ या कालावधीत त्यात २४३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार सायबर गुन्ह्यांची संख्या १३७५ वरून ३७२३ पर्यंत वाढली आहे. २०२२ मध्ये ‘क्रेडिट कार्ड फसवणुकीचे सायबर गुन्हे सर्वाधिक नोंदवलेले गेले आहेत.
दरम्यान, सायबर गुन्हे तपासात तांत्रिक अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गुन्हे रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती आवश्यकता आहे. त्याप्रमाणे पोलीस जनजागृती करीत आहेत, असं नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी म्हटलं आहे.