Tata Tiago EV launched new car :गेल्या काही दिवसात देशात आणि जगात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. देशातली सर्वात स्वस्त ईव्ही आज टाटा मोटर्सने (tata motors)लाँच केलीय. टाटा टियागो ईव्ही (Tata Tiago EV )अवघ्या साडेआठ लाखांत टाटाने उपलब्ध करून दिलीय. आज जागतिक ईव्ही दिनानिमित्त ही कार लाँच करण्यात आली. कारची किंमत 8.49 लाखांपासून सुरू असुन 12.49 लाख इतकी आहे.देशातील सर्वात स्वस्त कार म्हणून या कारकडे पाहिलं जात.
काही काळापासून जगासह भारतात इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे देशात इलेक्ट्रिक कारचे नवे मॉडेल लॉन्च करण्यासाठी ऑटोमेकर्समध्ये(automakers) स्पर्धा लागली आहे. टाटा मोटर्सची भारतातील इलेक्ट्रिक कार (electric car segment)सेगमेंटमध्ये मजबूत पकड आहे. सध्या कंपनी देशात तीन इलेक्ट्रिक कार विकते. आता टाटा मोटर्सने आपली इलेक्ट्रिक कार टाटा टियागो ईव्ही आज लॉन्च केली.
जाणून घ्या काय असेल या कारची खासियत.
Tiago EV मध्ये 26kWh चा बॅटरी पॅक दिसू शकतो. तसेच, यात 74 bhp पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करणारी इलेक्ट्रिक मोटर देणे अपेक्षित आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये 310 किमीपर्यंतची रेंज पाहता येईल. या कारची बॅटरी फास्ट चार्जरच्या मदतीने केवळ 1 तासात 0 ते 80% पर्यंत चार्ज होऊ शकते.
कसे असतील फीचर्स
टाटा टियागो EV वर मल्टिपल ड्राइव्ह मोड्स, फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, फॉग लॅम्प्स, मल्टी-मोड रीजन फंक्शन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, क्रूझ कंट्रोल यांसारखी वैशिष्ट्ये पाहता येतील.
काय असेल किंमत
Tata Tiago EV ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असू शकते. सध्या, भारतातील सर्वात कमी किमतीची इलेक्ट्रिक कार टाटा टिगोर आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 12.49 लाख रुपये आहे. टाटा टियागो इलेक्ट्रिकची किंमत 10 ते 12 लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.