मुंबई : इंटरनेटच्या जगात आपण उद्योजकाच्या घरातच जन्माला यायला हवं, असं काही नाही. तुमची आयडीया किंवा तुम्हाला येणाऱ्या अडचणी किती लोकांना येतात, आणि जास्तच जास्त लोकांना येत असतील, तर अशा अडचणी तुमच्या एखाद्या अॅपने, वेबसाईटने कमी होत असतील, तर तुम्ही एक यशस्वी उद्योजक होऊ शकतात.
वेदांशू पाटील हा युवा उद्योजक याच प्रकारे नावारूपाला येत आहे. वेदांशूने सिंगापूरहून एमबीए केलं आणि यानंतर भारतात येऊन बरेच दिवस, आपल्याला काय नवीन करता येईल, याचा शोध घेतला.
वेदांशू आज नेटीझन्समध्ये एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळखला जात आहे. वेदांशूने 'ग्रोथ मंत्रा फॉर आंत्रपीनीअरशीप' हा व्यवसाय सुरू केला. वेदांशू हा यशस्वी स्वाक्षरी विश्लेषक आहे. त्याचा यावरील अॅपही प्रचंड लोकप्रिय झाला आहे, त्याचीच कहाणी त्याने वाटाड्या या पुस्तकात उतरवली आहे.
वाटाड्या या पुस्तकाचं प्रकाशन नाशिकला, 4 जानेवारी 2018 रोजी होणार आहे. विश्वास लॉन्स गंगापूर रोड नाशिकला, काही दिग्गजांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. हे पुस्तक अनेक युवा उद्योजकांना प्रेरणा देणार ठरेल, असं युवा उद्योजक वेदांशू पाटीलने म्हटलं आहे.