'सॅमसंग' आणणार 6 जीबी रॅमचा मोबाईल

नव्या स्मार्टफोनमध्ये एक्झोनस 8895 मोबाईल प्रोसेसर आणि 6 जीबी 'रॅम' आहे, असे  दिसते. 

Updated: Aug 13, 2017, 07:32 PM IST
'सॅमसंग' आणणार 6 जीबी रॅमचा मोबाईल title=

मुंबई : सॅमसंग गॅलेक्सी नोट 8 मध्ये तब्बल 6 जीबी 'रॅम' असलेला मोबाईल फोन आणणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची चाचणी घेणाऱया Geekbench या प्लॅटफॉर्मवर तशी माहिती मिळते. 

प्लॅटफॉर्मवर चाचणीसाठी दाखल झालेल्या हँडसेटवरून, नव्या स्मार्टफोनमध्ये एक्झोनस 8895 मोबाईल प्रोसेसर आणि 6 जीबी 'रॅम' आहे, असे  दिसते. 

Geekbench वरील माहितीचे तपशील Telefoon.nl या वेबसाईटवर ही माहिती देण्यात आली आहे त्यामधील माहितीनुसार, सॅमसंग गॅलेक्सी नोट 8 मोबाईल हँडसेट 6.3 इंचाचा असेल. सॅमसंग गॅलेक्सी नोट 8 मध्ये अँड्रॉईडची 7.1.1 ही आवृत्ती असेल. 

खालील फीचर्स असतील

मोबाईलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर
3 हजार मिली अँप अवर (mHA) इतकी बॅटरीची क्षमता
मोबाईलमध्ये 64 जीबी इंटर्नल स्टोअरेज
वायरलेस चार्जिंगची सुविधा
12 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
सुमारे 75 हजार रूपये किंमत