फक्त ४९० रुपयांमध्ये मिळतोय सॅमसंगचा हा स्मार्टफोन

फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईट फेस्टिव सेलमध्ये ग्राहकांना बम्पर डिस्काऊंट मिळत आहे.

Updated: Aug 7, 2017, 04:33 PM IST
फक्त ४९० रुपयांमध्ये मिळतोय सॅमसंगचा हा स्मार्टफोन  title=

मुंबई : फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईट फेस्टिव सेलमध्ये ग्राहकांना बम्पर डिस्काऊंट मिळत आहे. याच स्किममध्ये ग्राहकांना सॅमसंग J3 प्रो स्मार्टफोन फक्त ४९० रुपयांमध्ये मिळू शकतो.

सॅमसंग J3ची मूळ किंमत ८,४९० रुपये आहे. या किंमतीवर ५०० रुपयांचा फ्लॅट डिस्काऊंट देण्यात आल्यामुळे फोनची किंमत ७५०० रुपये झाली आहे. पण ग्राहकांना पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाली तर हा स्मार्टफोन फक्त ४९० रुपयांमध्ये मिळू शकणार आहे. एवढच नाही तर जिओ यूजर्सना ६० जीबी डेटाही देण्यात येणार आहे. यूजर्सना ३९९ रुपयांच्या ६ रिचार्जवर हा डेटा प्लॅन वापरता येईल.

सॅमसंग गॅलेक्सी J3चे फिचर्स

सॅमसंग गॅलेक्सी J3मध्ये ५ इंचांची एचडी सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 1.2 गीगाहर्ट्ज क्वाड-कोर प्रोसेसरवर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून मेमरी १२८ जीबीपर्यंत वाढवण्यात येऊ शकते. या स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसोबत ८ मेगापिक्सलचा रियर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची बॅटरी २६०० एमएएच एवढी आहे.