आता येणार फोल्डेबल डिस्प्ले असणारा Samsung Galaxy X

Apple ने आयफोन X लॉन्च केल्यानंतर आता सॅमसंगही आपला 'Samsung X' लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर येत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 1, 2017, 10:50 PM IST
आता येणार फोल्डेबल डिस्प्ले असणारा Samsung Galaxy X  title=

मुंबई : Apple ने आयफोन X लॉन्च केल्यानंतर आता सॅमसंगही आपला 'Samsung X' लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर येत आहे.

असं म्हटलं जात आहे की, 'Samsung X' या स्मार्टफोनमध्ये फोल्डेबल स्क्रीन असणार आहे. सॅमसंगने दावा केला आहे की, २०१८ पर्यंत हा स्मार्टफोन युजर्सच्या हातात मिळेल.

रिपोर्ट्सनुसार, फोल्डेबल डिस्प्ले असणार हा पहिला स्मार्टफोन असणार आहे. 'Samsung X' हा स्मार्टफोन SM-G888N0 मॉडल नंबरसोबत उपलब्ध होणार आहे.

मात्र, हा फोन कधी लॉन्च होणार यासंबंधी कंपनीने अधिकृत घोषणा केलेली नाहीये. यापूर्वी असोसिएटेड प्रेसने सॅमसंगच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा उल्लेख करत वृत्त दिलं होतं की, २०१८ मध्ये सॅमसंग एक फोल्डेबल स्क्रीन असलेला स्मार्टफोन लॉन्च करेल.